चेन्नईचा चाईल्ड रेपिस्ट मुंबईत मोकाट


चेन्नईचा चाईल्ड रेपिस्ट मुंबईत मोकाट
SHARES

सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिची आणि जन्मदात्या आईची हत्या करून पोलिसांना चकवा देऊन पळालेला कैद्दी एस. दसवंत सध्या मुंबई शहरात मोकाट फिरत आहे. त्यामुळे सगळीकडेच भीतीचं वातावरण आहे. बुधवारी चैन्नई पोलिसांच्या पथकानं दसवंतला मुंबईतून अटक केली होती. मात्र, दसवंतने पोलिसांना चकवा देत पळ काढला. सध्या चैन्नई पोलिसांसह मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखा दसवंतचा शोध घेत आहेत.कसा दिला पोलिसांना चकवा?

बुधवारी अटक केल्यानंतर चेन्नई पोलिसांनी दसवंतला स्थानिक कोर्टात हजर करून त्याचा ट्रान्झिट रिमांड घेतला. गुरुवारी चेन्नईला जाण्यापूर्वी जेवणासाठी विलेपार्ले येथील एका हॉटेलात चेन्नई पोलिसांचं पथक थांबलं. जेवणापुरतं कॉन्स्टेबलनं दसवंतची बेडी काढली आणि संधी मिळताच कॉन्स्टेबलला चकवा देत दसवंतने पळ काढला.


कोण आहे एस. दसवंत?

एस. दसवंत हा एक सराईत गुन्हेगार आहे. फेब्रुवारी महिन्यात शेजारी राहाणाऱ्या सात वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून त्यानंतर तिचा मृतदेह जाळून टाकल्याप्रकारणी दसवंतला पोक्सो अंतर्गत अटक झाली होती. मात्र, तो सप्टेंबर महिन्यात जामिनावर बाहेर आला. ५ डिसेंबरला स्थानिक पोक्सो न्यायालयात दसवंतवर खटला सुरू होणार होता. मात्र, खटला सुरू होण्यापूर्वी तीन दिवस आधी दसवंतनं आपल्या आईची हत्या करून घरातील मौल्यवान ऐवज चोरून पळ काढला.


घोडे शर्यतींवर बेटिंग करण्याचा शौकीन

दसवंतला घोड्याच्या शर्यतींवर बेट लावण्याचा छंद होता. त्याला पकडण्यासाठी तामिळनाडू पोलिसांनी पथक तयार करून मोठ-मोठ्या शहरातील घोडे शर्यतींवर नजर ठेवण्यास सुरुवात केली. त्यांची एक टीम मुंबईला देखील आली होती. बुधवारी महालक्ष्मी रेस कोर्सवर एस दसवंत दिसल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती.हेही वाचा

पत्नीची हत्या करून मृतदेह पिशवीत कोंबणाऱ्या नवऱ्याला अटक


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा