केतकी चितळेला ट्रोल करणाऱ्यांवर कारवाई करा, मुख्यमंत्र्याचे आदेश

व्हिडीओ बनवताना केतकीने म्हटलं की, माझे फाॅलोअर्स इतर भाषेतही असल्याने मी हा व्हिडीओ हिंदी आणि इंग्लीशमध्ये बनवत आहे. त्यामुळे यावर आता कोणी प्रतिक्रिया देऊन मराठीचे झेंडे फडकवू नका.

केतकी चितळेला ट्रोल करणाऱ्यांवर कारवाई करा, मुख्यमंत्र्याचे आदेश
SHARES

तुझं माझं ब्रेक अप’ या मालिकेतून प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री केतकी चितळे हिचा हिंदीमध्ये केलेला व्हिडिओ सोशल मिडियावर ट्रोल झाला. तिच्या व्हिडीओवर अनेक जणांनी अश्लील प्रतिक्रिया दिल्या. त्यामुळे केतकीने मंगळवारी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे, अभिनेते सुशांत शेलार, दिगंबर नाईक, प्रकाश वालावलकर यांच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी केतकीविरोधात अश्लील कमेंट करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले.


मराठीचे झेंडे फडकवू नका

काही दिवसांपूर्वी केतकीने सोशल मिडियावर एक व्हिडिओ बनवला होता. हा व्हिडीओ बनवताना केतकीने म्हटलं की, माझे फाॅलोअर्स इतर भाषेतही असल्याने मी हा व्हिडीओ हिंदी आणि इंग्लीशमध्ये बनवत आहे. त्यामुळे यावर आता कोणी प्रतिक्रिया देऊन मराठीचे झेंडे फडकवू नका. केतकीच्या या विधानामुळे तिला अनेकांनी ट्रोल केले. या व्हिडीओवर काहींनी अश्लील कमेंटही दिल्या. ह्या कमेंट पाहून केतकीने आणखी एक व्हिडीओ सोशल मिडीयावर टाकून या ट्रोलर्सची खरडपट्टी काढली. मात्र, यामुळे ट्रोलर्स आणखीनच चिडले. 


ह्या व्हिडीओमुळे केतकी ट्रोल



कठोर पावले उचलावीत

प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यानंतर केतकीने शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे, अभिनेते सुशांत शेलार, दिगंबर नाईक, प्रकाश वालावलकर यांच्यासह मुख्यमंत्र्यांची भेट घेत निवेदन दिल. याच निवेदनाच्या आधारे मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियावरून खोट्या अकाउंटच्या माध्यमातून अश्लील भाषेत ट्रोल करणाऱ्यांना अटक करण्याची सूचना गुन्हे अन्वेषण शाखेतील अधिकाऱ्यांना केली आहेमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनात आयटी कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे. शासनाने सदर प्रकरणात कठोर पावले उचलावीत. त्याचप्रमाणे आयटी अॅक्टमध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा, अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.



हेही वाचा  -

३०० परदेशी पक्षांची तस्करी, डीआरआयचे ७ ठिकाणी छापे

तुझ्यात जीव रंगला मालिकेतील अभिनेत्याला फसवणूकीप्रकरणी अटक




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा