उबर चालकाने 'या' अभिनेत्रीसोबत काय केले? वाचा


SHARE

हास्य कलाकार आणि अभिनेत्री असलेल्या मलिका दुअा हीने आपल्या फेसबुक अकाऊंटवर उबेर चालकासंदर्भातला एक भयावह अनुभव शेअर केला आहे.काय झाले या अभिनेत्रीसोबतोे?

अभिनेत्री मल्लिका दुआ हीने रविवारी संध्याकाळी अंधेरीहून वांद्र्याला जाण्यासाठी उबर गाडी बुक केली होती. त्याप्रमाणे चालक गाडी घेऊन आल्यानंतर ती गाडीत बसलीही. गाडीत बसल्यानंतर 'आपल्याला उकडतंय, जरा एसीचे टेम्परेचर वाढवा' असे तिने चालकाला सांगितले. पण चालकाने काही तिचे म्हणणे ऐकले नाही. उलट त्याने तिला गाडीतून उतरण्यास सांगितले. हे ऐकून मल्लिकाही शांत बसली नाही, ती म्हणाली, 'मी पूर्ण पैसे दिले आहेत, मग गाडीतून का उतरू'. तिने असे म्हणताच ड्रायव्हरने तिला 'उतर गाडी मेसे' असे म्हणत चक्क शिविगाळ करू लागला. त्या चालकाचे नाव चेतन असे आहे.या घटनेनंतर तिने यासंदर्भात उबर मालकाकडे तक्रार केली. त्यानंतर उबेर मालकाने चालकाविरोधात कारवाई केल्याचे आश्वासन तिला दिले. पण जेव्हा तिने उबरच्या मालकांकडे कारवाई केल्याचा पुरावा मागितला, तेव्हा उबेर कंपनीने अद्याप काहीच उत्तर दिलेले नाही. या घटनेनंतर तिने हा अनुभव फेसबुकवर शेअर केला आहे.


हेही वाचा - 

उबरची ‘सेल्फी’श पॉलिसी


संबंधित विषय