Advertisement

उबरमध्ये रोमान्स कराल तर 'हे' होईल!


उबरमध्ये रोमान्स कराल तर 'हे' होईल!
SHARES

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून ओला-उबर या खासगी कंपन्यांच्या विरोधातील ओला-उबर टॅक्सी चालक-मालकांच्या संपाची आणि आंदोलनाचीच चर्चा मुंबईसह देशभर आहे. पण आता याहीपेक्षा उबरसंदर्भातील एक गरमागरम चर्चा सध्या सुरू आहे. या चर्चेमुळे वातावरणही चांगलेच तापले आहे. ही चर्चा म्हणजे आता उबर टॅक्सीत मागच्या सीटवरून बसून जोडप्यांना रोमान्स करता येणार नाहीये. इतकेच नव्हे तर कुठल्याही व्यक्तीला फ्लर्ट किंवा सेक्सही करता येणार नाही.

उबर टॅक्सीच्या मागे बसून रोमान्स, फ्लर्ट आणि सेक्स करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. परिणामी ड्रायव्हरचे चित्त विचलित होऊन अपघात होण्याची शक्यता असल्याचे म्हणत उबरने आपली नवीन पॉलिसी जाहीर केली आहे. या पॉलिसीनुसार आता मागच्या सीटवर बसून रोमान्स, फ्लर्ट आणि सेक्स करणाऱ्यांना टॅक्सीतून उतरवले जाईल. इतकेच नव्हे तर टॅक्सीतून उतरवल्यानंतर ड्रायव्हरशी हुज्जत घातली तर त्यांचा परवानाही रद्द होईल आणि पुढे कधीही उबर टॅक्सीची सेवा त्यांना उपलब्ध होणार नाही. नव्या पॉलिसीनुसार प्रवासादरम्यान टॅक्सीत कचरा टाकता येणार नाही. तर मद्यपान करणाऱ्यांनाही टॅक्सीत नो एण्ट्री असणार आहे. शिवीगाळ वा अपमानास्पद शब्द वापरणाऱ्यांवरही कारवाई होणार आहे. ही पॉलिसी मुंबईसह देशभर लवकरच लागू होणार आहे.

तर प्रवाशांनीही याबाबत संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. "एसी टॅक्सीमुळे तरूण-तरूणी उबर टॅक्सीला प्राधान्य देत रोमान्स, फ्लर्ट करतात हे खरे असून त्यातून काही अनुचित घडू शकते. त्यामुळे असे नियम योग्यच असल्याचे काही प्रवाशांचे म्हणणे आहे." तर काही प्रवाशांनी "आम्ही पैसे मोजतो त्यामुळे आम्ही मागे बसून काय करतो याच्याशी कुणाला काही देणेघेणे नसावे," असे म्हटले आहे.

दरम्यान, उबर टॅक्सी चालक-मालकांनी मात्र ही पॉलिसी चांगली आहे पण या पॉलिसाचा परिणाम व्यवसायावर होईल, असे म्हटले आहे. "आम्हाला तर कधी कुणाच्या रोमान्सचा त्रास झालेला नाही वा कुणीही आमच्याशी कधी शिवीगाळ वा अर्वाच्च्य भाषेत बोललेलं नाही. त्यामुळे असे इतके कडक नियम केले तर नक्कीच प्रवाशांची संख्या कमी होईल," असे एका उबर टॅक्सीचालकाने मुंबई लाईव्हला सांगितले आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा