वडाळा ट्रक टर्मिनस होणार कमर्शियल हब

 Pali Hill
वडाळा ट्रक टर्मिनस होणार कमर्शियल हब

मुंबई - मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अखत्यारीतील वडाळा ट्रक टर्मिनसचा लवकरच विकास होणार आहे. या जागेचा कमर्शियल हब म्हणून विकास करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला असून, येथे निवासी प्रकल्पही असणार आहेत. यासंबंधीचा प्रस्ताव आणि आराखडा तयार करण्याच्या कामाला एमएमआरडीएने वेग दिल्याची माहिती एमएमआरडीएतील सूत्रांनी दिली आहे. वडाळा ट्रक टर्मिनसचा कमर्शियल हब करण्याचा निर्णय याआधीच घेण्यात आला आहे. पण यात काही तांत्रिक अडचणी आल्याने हा कमर्शियल हबचा प्रकल्प रखडला होता. आता मात्र प्रकल्प लवकरच मार्गी लागणार आहे.

Loading Comments