धावत्या लोकलमधून फेकल्याने ३२ वर्षीय प्रवाशाचा मृत्यूला झाल्याचा खळबळजनक प्रकार सँडहर्स्ट रोड स्थानकाजवळ शुक्रवारी संध्याकाळी घडला. या प्रकरणी वडाळा रेल्वे पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली किशोर जावळे(२४) नावाच्या तरुणाला अटक केली आहे. फेकण्यामागे चोरीचा उद्देश नसल्याचा दावा यावेळी पोलिसांनी केला आहे.
मानखुर्द येथील रहिवासी असलेले रूबल निशाद(३२) हे शुक्रवारी हार्बर लोकलने सीएसटीएमच्या दिशेने जात असताना त्यांच्याच डब्यातील एकाने अचानक त्यांना धक्का दिला. धक्का दिल्याने रुबल यांचा तोल गेला आणि ते खाली पडले. त्यांना उपचारासाठी तात्काळ जे.जे. रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, डब्यातल्या इतर प्रवाशांनी किशोर जावळेला पकडले आणि पोलिसांच्या हवाली केले. जावळेला हत्येचा आरोपाखाली अटक करण्यात आल्याची माहिती वडाळा जीआरपीने दिली आहे.
अशा प्रकारे लोकलमधून फेकून देण्यामागचं कारण अद्याप समजू शकलं नसून आरोपी हा मानसिकदृष्टया स्थिर नसल्याचा पोलिसांना संशय आहे.
हेही वाचा