गोरेगाव आग प्रकरणी तिघांना अटक


गोरेगाव आग प्रकरणी तिघांना अटक
SHARES

गोरेगावमधील 'टेक्‍निक वन प्लस' या इमारतीला रविवारी लागलेल्या आगीत ९ जण जखमी झाले, तर चौघांचा होरपळून मृत्यू झाला. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी सातव्या मजल्यावरील कार्यालयातील साहित्य काढण्यासाठी कंत्राट दिलेल्या खासगी कंपनीच्या मालकासह इतर दोघांना अटक केली आहे. 


या तिघांना अटक

नितीन कोठारी (२१), रमजान खान (२१) सलीम मणियार (३५) अशी या अटक आरोपींची नावं आहेत. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे.


संपूर्ण प्रकार

गोरेगावमधील 'टेक्‍निक वन प्लस' या इमारतीला रविवारी संंध्याकाळी ४ वा. भीषण आग लागली. या आगीची वर्दी मिळताच अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र काचेची इमारत असल्याने आग काचेवरील जिलेटीनच्या संपर्कात आल्यानंतर इमारतीत मोठ्या प्रमाणात धूर पसरला. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवताना श्वसणाचा त्रास जाणवू लागला. या आगीत एका रहिवाशासह ३ अग्निशमन दलाचे जवान जखमीही झाले. जिवावर खेळत अग्निशमन दलाच्या जवानांनी ५ जणांना इमारतीतून सुखरूप बाहेर काढलं.


आणि तिघांना अटक

या इमारतीत एका कंपनीत दुरुस्तीचे काम सुरू असताना हा शॉर्टसक्रीट झाल्याचं प्राथमिक माहितीत पुढे आलं. त्यानुसार कंपनीचे मालक नितीन कोठारीसह दुरुस्तीच्या कामाचे सुपरवाझर रमजान खान आणि सलीम मणियार यांच्यावर गोरेगाव पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवत त्यांना अटक केली असल्याचं सांगितलं.


हेही वाचा - 

काचेच्या इमारतींमधील सेंट्रलाईज्ड एसी ठरतात कर्दनकाळ

मालाडमध्ये एमएम मिठाईवाला दुकानाला मोठी आग

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा