Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
51,38,973
Recovered:
44,69,425
Deaths:
76,398
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
45,534
1,794
Maharashtra
5,90,818
37,236

गोरेगावमधील भीषण आगीत तिघांचा मृत्यू

गोरेगावमध्ये 'टेक्निक प्लस वन' या इमारतीच्या दुसऱ्या मजल्याला रविवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास आग लागली. या आगीत तिघांचा मृत्यू झाला असून ९ जण जखमी झाले आहेत.

गोरेगावमधील भीषण आगीत तिघांचा मृत्यू
SHARES

गोरेगावमध्ये 'टेक्निक प्लस वन' या इमारतीच्या दुसऱ्या मजल्याला रविवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास आग लागली. या आगीत तिघांचा मृत्यू झाला असून ९ जण जखमी झाले आहेत. दुसऱ्या मजल्याला लागलेली आग पसरत पसरत आठव्या मजल्यापर्यंत पोहोचली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती आहे.

नैमुद्दीन शाह (२५), रामअवतार (४५) आणि राम तिर्थपाल  (४५) अशी मृतांची नावे आहेत.


जवान गुदमरले

आगीची वर्दी मिळताच अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या . त्यांनी त्वरित आग विझवण्याचं काम सुरू केलं. मात्र आगीवर नियंत्रण मिळवत असताना धुरामुळे अग्निशमन दलातील  ५ जवानांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला. तर ३ जवनांसहित एक रहिवासी देखील जखमी झाल्याने त्यांना त्वरीत गोरेगावच्या सिद्धार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यातील २ जवानांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आलं आहे.

अग्निशमन  दलाच्या जवानांनी एकूण ५ जणांची सुखरूप सुटका केली तर, सातव्या मजल्यावर एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला.


नागरिकांनी दाखवली सतर्कता

रविवारी दुपारी या इमारतीतून धूर येत असल्याचा संशय नागरिकांना आला. दरम्यान स्थानिकांनी याची माहिती अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. ही लेव्हल ३ ची आग होती.हेही वाचा-

फेसबुकवरील फ्रेंडशिप पडली महागात!Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा