दीपिकाची चौकशी करणाऱ्या NCB च्या केपीएस मल्होत्रांना कोरोना

सध्या केपीएस मल्होत्रा यांच्यावर दिल्लीत उपचार सुरू आहेत.

दीपिकाची चौकशी  करणाऱ्या NCB च्या केपीएस मल्होत्रांना कोरोना
SHARES

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात बॉलिवूडचं ड्रग्स कनेक्शन उघडकीस आलं. या प्रकरणात अनेक तारकांची नावे पुढे आल्यानंतर NCB ने त्यांच्या भोवती फास आवळला. या अभिनेत्रींची चौकशी करणारे NCBचे अधिकारी केपीएस मल्होत्रांना यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या केपीएस मल्होत्रा यांच्यावर दिल्लीत उपचार सुरू आहेत.

हेही वाचाः- सुशांत सिंह प्रकरण: हत्या नव्हे, आत्महत्याच! एम्सचा रिपोर्ट सीबीआयला सादर

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा संबंध आणि ड्रग्स कनेक्शनशी असल्यामुळे बॉलिवूडमधील अनेक चर्चित चेहरे हे NCB च्या रडारवर आहेत. नुकतीच अभिनेत्री दीपिका पदुकोणष श्रद्दा कपूर आणि सारा अली खानची चौकशी झाली आहे. यामध्ये NCB एसआयटी टीमने दीपिकाची कसून चौकशी केली होती. या टीममध्ये केपीएल मल्होत्रा लीड करत होते. २६ सप्टेंबर रोजी दीपिकाची साडे पाच तास चौकशी झाली. यावेळी तिला सुशांत सिंह राजपूत आणि रियाशी संबंधित प्रश्न विचारले गेले. NCB चा संपूर्ण फोकस दीपिका आणि तिची एक्स मॅनेजर करिश्मासोबत झालेल्या चॅटवर होता. दीपिकाने देखील या चॅटबद्दल कबुली केली.

हेही वाचाः- हॉटेल-रेस्टॉरंटसाठी बीएमसीची नियमावली जारी

तपासाचे सत्र सुरू असतानाच NCB च्या काही अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे तपासात व्यत्यय देखील आला. केपीएस देखील या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आले असण्याची शक्यता वर्तवली जात असल्यामुळे त्यांना कोरोना झाल्याचे कळते. केपीएस यांनीच सुशांत सिंह राजपूत प्रकरणात रिया चक्रवर्ती, दिपीका पदुकोन, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रित सिंह यांची चौकशी केली होती.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा