देशांत कोरोना संकटाने हाहाकार माजवला असून या आजाराला अत्यावश्यक सेवेतील पोलिस मोठ्या संख्येने बळी पडू लागले आहेत. महाराष्ट्र पोलिस दलातील ६० कर्मचाऱ्यांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यात मुंबई पोलिस दलातील ३८ जणांचा समावेश आहे. महाराष्ट्र पोलिस दलात सध्या १०१५ पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झालेली आहे.
हेही वाचाः- मुंबईत १५ जुलैपर्यंत जमावबंदी
महाराष्ट्र राज्यात ४९०० पोलिस कर्मचार्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. तर यामध्ये मुंबई खात्यातील २६०० कर्मचार्यांचा समावेश आहे. मागील २४ तासांमध्ये ८२ पोलिस कर्मचार्यांना कोरोना व्हायरसवर मात केल्याने त्यांना सोडण्यात आले आहे. तर आत्तापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या ३७०० जणांनी कोविड १९ या आजारावर मात करून ही लढाई जिंकली आहे. पोलिस खात्यामध्ये अजूनही १०१५ कर्मचार्यांवर उपचार सुरू आहेत. तर महाराष्ट्र पोलिस दलामध्ये आज मागील २४ तासांमध्ये ७७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पोलिसांमध्ये कोरोनाचे वाढते प्रमाण हे बेजबाबदार नागरिकांमुळे वाढत असल्याचे दिसून आले आहे. अनेकदा आवाहन करून ही नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत आहेत. नागरिकांच्या थेट संपर्कात पोलिस येत असल्यामुळे पोलिसांमध्ये कोरोनाचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे.
हेही वाचाः- Mumbai Rains: ४ जुलैपासून मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता
दरम्यान अशा बेजबाबदार नागरिकांनी घराबाहेर पडून नये. यासाठी पोलिसांनी ठिक ठिकाणी नाकाबंदी लावून नागरिकांच्या गाड्या जप्त करण्यास सुरूवात केली आहे. पोलिसांनी दोन दिवसात तब्बल २३ हजार गाड्या जप्त केल्या आहेत. तर लाँकाऊनतचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांना १ लाख ३९ हजार ७०२ जणांवर नियमांचा भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. तर २९ हजार ४२५ जणांना अटक देखील झाली आहे. २९० प्रकरणांमध्ये पोलिसांवर हल्ला झाला आहे. त्यापैकी ८६ जण जखमी झाले तर ५४ आरोग्य कर्मचार्यांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. यामध्ये ८६० जणांना अटक झाली आहे. पोलिसांनी लॉकडाऊनच्या या काळामध्ये सुमारे ९.९५ कोटी दंडाच्या स्वरूपात वसुल केली आहे.