दिवसभरात ४ पोलिसांचा कोरोनाने मृत्यू, ३६४ नवे रुग्ण

सद्य घडीला ३ हजार ७९६ कोरोनाबाधित अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत ज्यांच्यावर उपचार सुरु आहेत. य

दिवसभरात ४ पोलिसांचा कोरोनाने मृत्यू, ३६४ नवे रुग्ण
SHARES

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीतही नागरिकांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलिस आही रस्त्यावर उभे आहेत. नागरिकांच्या थेट संपर्कात येत असल्यामुळे पोलिसांमध्ये कोरोनचे प्रमाण वाढत आहे. मागील २४ तासांत महाराष्ट्र पोलिस दलातील ४ जवान दगावल्याची माहिती मिळत आहे. यामुळे आतापर्यंत एकूण २०,३६७ महाराष्ट्र पोलिस कोरोना बाधित झाले असून २०८ जण दगावल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

हेही वाचाः- हृदयद्रावक घटना : आई पाठोपाठ पोलिसाचाही कोरोनाने मृत्यू

राज्यातील ग्रामीण विभागातील पोलिसांमध्ये कोरोनामुळे पोलिसांचे मृत्यू चितेंचे विषय ठरत आहे. बीड, कोल्हापूर, चंद्रपूर, बुलढाणा या जिल्ह्यांतही ऑगस्ट महिन्यात कोरोनामुळे पोलिसांचे मृत्यू झाले. याशिवाय राज्य राखीव पोलिस दलाच्या विविध तुकड्यांमध्येही ऑगस्ट महिन्यात पोलिसांचे कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत. महाराष्ट्र पोलिस दलात आज, १७ सप्टेंबर रोजीच्या अपडेटनुसार, पुन्हा ३६४ नवे कोरोनाबाधित कर्मचारी आढळून आले आहेत. यानुसार राज्य पोलिस दलातील आजवरच्या एकुण कोरोनाबाधितांची संख्या २० हजार ३६७ इतकी झाली आहे. प्राप्त माहितीनुसार, मागील २४ तासात कोरोनामुळे ४ पोलिस कर्मचार‍‍र्‍यांंचा मृत्यु सुद्धा झाला होता त्यामुळे कोरोनामृतांचा आकडा २०८ इतका झाला आहे. आजवर आढळलेल्या २०३६७ रुग्णांपैकी १६ हजार ३६३ रुग्णांनी आजवर या जीवघेण्या विषाणुवर मात केली आहे. तर सद्य घडीला ३ हजार ७९६ कोरोनाबाधित अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत ज्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यापैकी बहुतांश जणांची प्रकृती नियंत्रणात आहे.

हेही वाचाः- दारूच्या परवान्यासाठी तळीरामांची गर्दी

कोरोना व्हायरस सुरु होताचा सोशल डिस्टंसिंग ची सक्ती करण्यात आली होती त्यावेळेस पोलिस २४ तास कडक बंदोबस्तात गस्त घालत होते. मात्र मागील काही दिवसात अनेक प्रसंगात या अंतर राखा नियमाचा फज्जा उडत आहे. कंगना मुंबईत येण्याचा कालचा प्रकार असो वा रिया च्या चौकशी दरम्यान होणारी गर्दी प्रत्येक ठिकाणी गर्दीला रोखण्यासाठी पोलिसांना पुढे जावे लागत असल्याने त्यांच्या जीवालाही धोका निर्माण होत आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय