पालघर हत्या प्रकरण: सीआयडीने केली आणखी १४ जणांना अटक

पालघर येथील गडचिंचले गावात जमावाकडून झालेल्या साधू हत्याकांड प्रकरणात सीआयडीने आणखी १४ जणांना अटक केली आहे.

पालघर हत्या प्रकरण: सीआयडीने केली आणखी १४ जणांना अटक
SHARES

पालघर येथील गडचिंचले गावात जमावाकडून झालेल्या साधू हत्याकांड प्रकरणात सीआयडीने आणखी १४ जणांना अटक केली आहे. हे प्रकरण सीआयडीने हातात घेतल्यापासून आतापर्यंत २४ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींची एकूण संख्या १३४ एवढी झाली आहे.

काय आहे प्रकरण?

पालघरमधील गडचिंचले गावात २ साधू आणि त्यांच्या चालकाची जमावाने हत्या केली होती. १७ एप्रिल रोजी दाभाडी-खानवेल मार्गावरून हे तिघेही आपल्या कारमधून नाशिकच्या त्र्यंबकेश्वरकडे जात होते. यावेळी शेकडो ग्रामस्थ रस्त्यावर जमा झाले. त्यांनी ही कार थांबवत प्रवाशांची विचारपूस करण्यास सुरुवात केली. मात्र प्रवाशांनी माहिती देण्याच्या आधीच काही लोकांनी गाडीच्या दिशेने दगडफेक सुरू केली. त्यानंतर या जमावाने कारमधील तिघांनाही चोर समजून लाठ्याकाठ्यांनी बेदम चोप दिला आणि त्यांना दगडाने ठेचून मारलं. हे प्रकरण चिघळल्यावर आरोपी जंगलात लपून बसले हाेते. पोलिसांनी जंगलात जाऊन तब्बल ११० जणांना अटक केली होती. यांत ९ अल्पवयीन आरोपींचाही समावेश आहे.

हेही वाचा- पालघर हत्याप्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करणार- अनिल देशमुख

पोलीस अधिक्षक निलंबित

ही घटना पोलिसांच्या डोळ्यादेखत झाल्याने विरोधकांनी या घटनेवरून सत्ताधारी महाविकास आघाडीवर जोरदार टीका सुरू केली. शिवाय याप्रकरणाची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा देण्याची मागणीही विरोधकांकडून करण्यात येत होती. त्यानंतर हे प्रकरण सीआयडीच्या ताब्यात देण्यात आलं.

काही दिवसांपूर्वीच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घटनास्थळाचा दौरा केला होता. गृहमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी देशमुख यांनी पालघर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची कारवाई केली. याआधी कासा पोलीस ठाण्याच्या दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलंं होतं.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा