लाॅकडाऊन असताना ही घराबाहेर पडल्याचा वाद विकोपाला, मोठ्या भावाने केली लहान भावाची हत्या


लाॅकडाऊन असताना ही घराबाहेर पडल्याचा वाद विकोपाला, मोठ्या भावाने केली लहान भावाची हत्या
SHARES

मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सरकारकडून संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत. अशा परिस्थितीत बाहेर पडणाऱ्या १७८ जणांवर पोलिसांनी आतापर्यंत गुन्हे नोंदवले आहेत. या भितीने पालक आपल्या मुलांना बाहेर पाठवण्यास मज्जाव करत आहेत. मात्र कांदिवलीत मोठा भाऊ आणि वहिणी घराबाहेर गेल्यावरून दोघा भावांमध्ये वाद झाला. लहान भाऊ उलटा बोलल्याचा रागातून मोठ्या भावाने त्याची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. दुर्गेश ठाकूर (२८) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी मोठ्या भावाला अटक केली आहे. 

हेही वाचाः- राणेंनी मागितली संजय राऊतांची माफी?

 कांदिवलीच्या समतानगर परिसरातील पशुपतीनाथ दुबे चाळीत दुर्गेश त्याचा मोठाभाऊ आणि वहिनीसोबत रहात होता. देशात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. त्या पार्श्वभूमिवर सरकारने संचारबंदीचे आदेश जारी करत, सर्वत्र लाॅकडाऊन केले आहे. तसेच नियमांचे उल्लघंन करू घराबाहेर पडणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करत गुन्हे नोंदवण्यास सुरूवात केली आहे. हे पाहून दुर्गेशने मोठ्या भाऊ आणि त्याची पत्नीला घराबाहेर न पडण्यास सांगितले होते. मात्र घरातील भाजीपाला संपला असल्याने मोठ्या भाऊ आणि वहिनी घराबाहेर भाजीपाला घ्यायला गेले. घरी परत आल्यावर लॉकडाऊन असताना तुम्ही दोघे बाहेर का गेला होता? अशी विचारणा लहान भावाने केली. त्यावर 'तू आम्हाला शिकवू नकोस, काय करायचे आहे ते आम्हाला चांगले माहीत आहे,' असं बोलून मोठा भाऊ लहान भावाशी वाद घालू लागला, हा वाद इतका विकोपाला गेला की दोघांमध्ये हाणामारी झाली. 

हेही वाचाः- डाॅक्टर, आरोग्य कर्मचारी यांना घर सोडण्यास भाग पाडणाऱ्यांवर होणार कारवाई

त्यावेळी राग अनावर झालेल्या मोठ्या भावाने दुर्गेशच्या डोक्यात लोखंडी तवा मारला. या मारहाणीत दुर्गेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला उपचारासाठी जवळील रुग्णालयात नेले. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. दुर्गेशच्या हत्येप्रकरणी समतानगर पोलिसांनी मोठ्या भावा विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

 

 

 

 

 

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा