Maharashtra Lockdown : लॉकडाऊनचे उल्लघंन करणाऱ्यांना आतापर्यंत ८ कोटीचा दंड आकारला

पोलिसांवर हल्ला होण्याच्या २७९ घटना घडल्या असून त्यात ८५८ व्यक्तींना ताब्यात घेतले

Maharashtra Lockdown : लॉकडाऊनचे उल्लघंन करणाऱ्यांना आतापर्यंत  ८ कोटीचा दंड आकारला
SHARES

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम १८८ नुसार  १लाख ३४हजार गुन्हे दाखल झाले असून २७ हजार ५११ जणांना आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे. या विविध गुह्यांसाठी ८ कोटी ६४ लाख १९ हजार ८७८ रुपयांचा दंड आतापर्यंत आकारण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

हेही वाचाः- salon and beauty parlor: सलून, ब्युटी पार्लर लवकरच सुरू करणार, ‘या’ मंत्र्याने दिली माहिती

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर महाराष्ट्रात दिवसेंदिवस नवीन रुग्ण समोर येत असताना. सरकारच्या डोकेदुखीत वाढ झालेली आहे. अशातच लॉकडाऊनचे उल्लघंन करणाऱ्यांची संख्या काही केल्या कमी होत नाही. म्हणूनच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लॉकडाऊनचे उल्लघंन करणाऱ्यांविरोधात कडक कारवी करण्याचे आदेश दिलेले आहे. राज्यात  लॉकडाऊनच्या म्हणजे २२ मार्च ते २२ जून  या कालावधीत  कलम १८८ नुसार  १,३४,४१२ गुन्हे नोंद झाले असून २७,५११ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ८ कोटी ६४ लाख १९  हजार ८७८  रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तसेच अत्यावश्यक सेवेसाठी  ५ लाख ४हजार ३१ पास  पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तर ६ लाख २८  हजार व्यक्तींना कॉरंटाईन (Quarantine) करण्यात आले आहे. अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. कोरोनाच्या महामारीत पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत असताना. त्यांच्यावर अनेक ठिकाणी हल्ला झाल्याच्या घटना ही पुढे आलेल्या आहेत. आतापर्यंत पोलिसांवर  हल्ला होण्याच्या २७९ घटना घडल्या असून त्यात ८५८ व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.

हेही वाचाः- Ramdev Baba : पतंजलीला नोटीस, आयुष मंत्रालयानं उचललं 'हे' कडक पाऊल

दरम्यान नागरिकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलिसांना २४ तासात  १०० नंबर वर  १,०४,३५१ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली.  तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे अशा ७४० व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण ६,२८,०९२  व्यक्ती Quarantine  आहेत. अशी माहिती श्री. देशमुख यांनी दिली. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३३५ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व ८४,१६१ वाहने जप्त करण्यात आली.

पोलिस कोरोना कक्ष

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने   मुंबईतील ३१ पोलीस व १ अधिकारी अशा एकूण ३२, पुणे ३, सोलापूर शहर २, नाशिक ग्रामीण ३, ए.टी.एस. १, मुंबई रेल्वे २, ठाणे ग्रामीण २, जळगाव ग्रामीण१, पालघर १, जालना  पोलीस अधिकारी १ अशा ४८ पोलिस बांधवांचा मृत्यू झाला. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली  तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. सध्या ११८ पोलीस अधिकारी व ९८२ पोलीस कोरोना  बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राज्यात सध्या एकूण ९८ रिलिफ कँम्प आहेत. त्या ठिकाणी जवळपास ३,२३५ लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा