आणखी एका पोलिस हवालदाराचा कोरोनामुळे मृत्यू


आणखी एका पोलिस हवालदाराचा कोरोनामुळे मृत्यू
SHARES
मुंबईतील 54 वर्षीय पोलिस हवालदाराचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधीत पोलिसांचा आकडा दोन हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचला असून त्यातील अर्ध्याहून अधिक पोलिस मुंबईतील आहेत. दुर्दैवाने राज्यातील 20 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दादर पोलिस ठाण्यात कार्यरत असल्यामुळे ते वरळी कोळीवाडा येथे मोबाईल गाडीवर बंदोबस्तासाठी तैनात होते. 20 मेला त्यांना थंडीताप वाजू लागल्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. 22 मेला आलेल्या अहवालात त्यांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना मरोळ येथील पीटीएस येथे दाखल करण्यात आले. तेथे व्यवस्थीत न वाटल्यामुळे अखेर त्यांना वरळीतील एन.एस.सी. आय येथे हलवण्यात आले. परंतु 24 मेला त्यांची तब्येत खालावली. तसेच् त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांना आग्रीपाडा येथील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील वॉर्ड क्रमांक 18 मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मंगळवारी 26 मेला त्यांची स्थीती आणखी खालावल्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृत पोलिस हे ठाण्यातील रहिवासी असून पोलिस मित्रांमध्ये अण्णा नावाने प्रचतील होते.  

मुंबईतील कोरोना बाधीत पोलिसांचा आकडा 1052 वर पोहोचला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने राज्यातील 20 पोलिसांना आपला जीव गमवावा लागला आहे.  तसेच राज्यात223 पोलीस अधिकारी आणि 1 हजार 741 पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार  सुरू आहेत. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली  तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. राज्यात एकूण 3 हजार 717  रिलिफ कँप आहेत. तर जवळपास3 लाख, 54 हजार 195  नागरीकांची व्यवस्था करण्यात आली आहे. 

कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाल्यास पोलिसांच्या कुटुंबियांना 65 ते 70 लाख रुपये आर्थिक मदत दिली जाणार असून त्याचप्रमाणे प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी मिळणार आहे. सुदैवाने राज्यात 849 पोलिस कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. त्यात 67 अधिका-यांचा समावेश आहे.  मुंबईतील वाकोला येथे पोलिसांसाठी विशेष कोविड केअर सेंटर स्थापन करण्यात आले असून मरिन ड्राईव्ह येथील पोलिस जीमखान्यात ही कोविड केअर सेंटर उभे करण्यात येणार आहे.
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा