लाँकडानमध्ये ई-पासचा काळाबाजार करणाऱ्याचा पर्दाफाश, 5 हजारांना विकत होता ई-पास

पोलीस तसेच जिल्हाधिका-यांच्या क्युआर कोडमध्ये फेरफारकरून 5 हजार रुपयांना पास विकत होता.

लाँकडानमध्ये ई-पासचा काळाबाजार करणाऱ्याचा पर्दाफाश, 5 हजारांना विकत होता ई-पास
SHARES
मुंबईत लाँकडाऊनमध्ये परिस्थितीचा फायदा घेऊन सर्व सामान्यांची ई-पाससाठी फसवणूक करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या ठगाचा कहर म्हणजे त्याने चक्क मुंबई, नवी मुंबई, पालघर पोलीस तसेच जिल्हाधिका-यांच्या क्युआर कोडमध्ये फेरफारकरून 5 हजार रुपयांना पास विकत होता. मनोज हुंबे असे अटक आरोपीचे नाव असून पोलिस अधिक तपास करत आहे.

मुंबई आणि आजूबाजूच्या शहरांमध्ये कोरोनाच्या महामारीमुळे जिल्हाबंदीची घोषणा करण्यात आली आहे. मागील दोन महिन्यांपासून असलेल्या या बंदीमुळे आर्थिक कमाई ठप्प झाल्याने अनेकांनी गावाची वाट धरली. माञ  जिल्हाबंदीमुळे ई-पास असलेल्यांनाच प्रवास करता येत असल्यामुळे सर्व सामान्यांकडून ई-पास मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे. नेमके याच संधीचा फायदा घेत, काही ठगांनी सर्व सामान्यांची लूट सुरू केली. सर्व सामान्यांकडून पाससाठी 5 ते 6 हजार रुपये घेऊन हे ठग  पालघर पोलिसांचा किंवा जिल्हाधिकाऱ्यांचा क्यू आर कोडमध्ये छेडछाडकरून ते नागरिकांना फसवत होते. याबाबतची माहिती डोंगरी पोलिसांना मिळाली. विशेष म्हणजे हा सर्व व्यवहार फक्त फोनवर चालायचा. ओळख लपवण्यासाठी हुंबे हा जाणून बुजून समोरच्याशी हिंदीतच बोलायचा असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.
 
पोलिसांनी हुंबेचा शोध घेत त्याला चेंबुर येथून अटक केली. त्याच्या चौकशीत तो मुंबई पोलीस आयुक्तांचे कार्यालय, नवी मुंबई पोलीस आयुक्तांचे कार्यालय, जिल्हाधिकारी मुंबई उपनगर यांचे कार्यालय तसेच जिल्हाधिकारी पालघर यांचे कायर्यालय यांच्यामार्फत प्रवासाची सवलत मिळण्यासाठी मिळणारे आॅनलाईन क्यूआर कोड मध्ये फेरफार करून सदरचे बनावट पास हे खरे पास आहेत असे प्रदर्शित करून सरकारची फसवणूक करीत असल्याचे समोर आले. यावेळी पोलिसांनी त्याला अटक केले असून याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिस उपायुक्त संग्रामसिंग निशानदार यांनी सांगितले.
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा