Coronavirus : पोलिसांची मज्जिद ट्रस्टीच्या विरोधात एफआयआर

एफआयआर नोंदविला आहे पण अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. याचा तपास सुरू आहे.

Coronavirus : पोलिसांची मज्जिद ट्रस्टीच्या विरोधात एफआयआर
SHARES

कोरोनाव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी देण्यात आलेल्या शासकीय आदेशांचे उल्लंघन करून १५० नागरिक नमाज पठण करत होते. मुंबई पोलिसांना ही माहिती मिळाल्यावर मशिदीच्या विश्वस्ताविरूद्ध सोमवारी एफआयआर दाखल करण्यात आली. सुन्नी शफी मशिदीच्या विश्वस्तांविरूद्ध पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे.

एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी पोलिसांना अशी माहिती मिळाली की, सीआरपीसी कलम १४४ अन्वये कोरोनव्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेता लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी घालण्याचे आदेश असूनही १००-१५० लोक मशिदीच्या आत नमाज पठन करत आहेत.

लवकरच सहाय्यक पोलिस आयुक्त अविनाश धर्माधिकारी यांच्या नेतृत्वाखालील पथक मशिदीत पोहोचले आणि भाविकांना तेथून जाण्यास सांगितलं. नंतर, पोलिसांनी आयपीसी कलम १८८ (सार्वजनिक सेवेच्या आदेशानुसार आज्ञा न मानणे), २६९ (आजारात जीवघेणा संसर्ग पसरण्याची शक्यता अशी निष्काळजी कृत्य) तसंच संबंधित कलमांतर्गत मज्जिद विश्वस्तांवर आयपीसी कलम अन्वये एफआयआर नोंदवली गेली.

धर्माधिकारी म्हणाले, "आम्ही एफआयआर नोंदविला आहे पण अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. याचा तपास सुरू आहे."

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा