पोलिसांसाठी जिमखान्यात विशेष कोविड सेंटर


पोलिसांसाठी जिमखान्यात विशेष कोविड सेंटर
SHARES

मुंबईतील कोरोना बाधीत पोलिसांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना आता पोलिसांच्या सुविधेसाठी पोलिस वसाहतींमधील इमारतींमध्ये विशेष कोविड केअर सेंटर उभारण्यात येत आहेत. त्यात आता मरिन ड्राईव्ह पोलिस जीमखान्याचीही भर पडणार असून लवकरच विशेष कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे. तेथे 50 खाटांचे करण्यात येणार असून   यापूर्वी सांताक्रुझ वसाहतींमध्ये 250 खाटांची सुविधा असलेलेले सेंटर उभारण्यात आले होते.

कोरोनाच्या संकटात वैद्यकीय कर्मचा-यांसह पोलीस अहोरात्र मेहनत घेत रस्त्यावर उभे आहेत. कोरोनाने पोलिसांनाही विळखा घातला आहे. पोलिस व त्यांच्या कुटुंबियांसाठी विशेष कोविड हेल्पलाईन पोलिस आयुक्तलयात सुरू करण्यात आली आहे. त्यावर बहुतांश पोलिस व कुटुंबियांनी रुग्णालयात भरती करण्यात येणा-या अडचणीबाबत तक्रार केल्या होत्या. त्यामुळे पोलिसांना अशा अडचणींना सामोरे जावे लागू नये, यासाठी पोलिसासाठी सांताक्रुझ वाकोला पोलीस वसाहतीतील एक इमारत कोविड केअर सेंटरमध्ये रुपांतरीत करण्यात आले होते. या ठिकाणी जवळपास250 खाटांची व्यवस्था केली गेली आहे. त्यांनतर आता मुंबई पोलिसांच्या मरिन ड्राईव्ह येथील जीम खान्यातही कोविड केअर सेंटरची उभारणी करण्यात येणार आहे. तेथे 50 खाटांची व्यवस्था करण्यात येणार आहे.


कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने राज्यातील 14 पोलिसांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच राज्यात142 पोलीस अधिकारी आणि 1 हजार 246 पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार  सुरू आहेत. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली  तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. राज्यात एकूण 3 हजार 717  रिलिफ कँम्प आहेत. तर जवळपास3 लाख, 54 हजार 195  नागरीकांची व्यवस्था करण्यात आली आहे.  कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाल्यास पोलिसांच्या कुटुंबियांना 65 ते 70 लाख रुपये आर्थिक मदत दिली जाणार असून त्याचप्रमाणे प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी मिळणार आहे. सुदैवाने मुंबईत आतापर्यत 191 कोरोनाबाधित पोलिसांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यात एका उपायुक्त दर्ज्याच्या अधिका-याचाही समावेश आहे

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा