कॅरम खेळलात तर होऊ शकते कारवाई

लॉकडाउनच्या काळात अनेकजण वेळ घालवण्यासाठी चाळ, सोसायटीच्या गॅलरीत, इमारतीच्या गच्चीवर सध्या कॅरमचा खेळ चांगलाच रंगत आहे.

कॅरम खेळलात तर होऊ शकते कारवाई
SHARES

लॉकडाउनच्या काळात अनेकजण वेळ घालवण्यासाठी चाळ, सोसायटीच्या गॅलरीत, इमारतीच्या गच्चीवर सध्या कॅरमचा खेळ चांगलाच रंगत आहे. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजत असल्यानं पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. भोईवाड्यामध्ये अशाच प्रकारे इमारतीच्या गच्चीवर एकत्र येत कॅरम खेळणाऱ्यांबाबत तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी चौकडीवर बुधवारी अटकेची कारवाई केली आहे.

पोलीस नाईक अरविंद कोंडीराम मोरे (४८) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी लागू असतानाही विनाकारण भटकणाऱ्यांची धडपड सुरू आहे. मुंबईत आतापर्यंत जमावबंदी, संचारबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी बुधवारपर्यंत तब्बल ९ हजार ३७३ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

यामध्ये ५ हजार ९१२ जणांना अटक करण्यात आली असून, २ हजार २२८ जणांना नोटीस देत सोडण्यात आले आहे. तर १ हजार १७९ आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. यातच मास्क न वापरलेल्यांविरुद्ध १,२०३ गुन्हे दाखल आहेत. परेल येथील किंजल व्हिलामध्ये काही तरुण कॅरम खेळत असल्याची तक्रार ४ एप्रिल रोजी भोईवाडा पोलिसांकडे करण्यात आली.

पोलिसांनी सुरक्षारक्षकांच्या मदतीनं याच इमारतीत राहणारे अभिजीत चंद्रकांत दुवाटकर (२८), मिथिल पारस जैन (२२), समीर अशोक राणे (४३), सोहन वासुदेव मायते (३०) या चौघांविरुद्ध नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत अटक केली. चौकशी दरम्यान, या मंडळींनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. यात समीर हा हार्डवेअर इंजिनीयर, तर मिथिल हा व्यावसायिक असून, अन्य दोघे नोकरी करतात. त्यामुळं तुमच्याविरुद्धही अशी कोणी तक्रार केल्यास, तुमच्यावरही कारवाई होऊ शकते. 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा