नकली नोटा बनवणारा गजाआड

 Govandi
नकली नोटा बनवणारा गजाआड

गोवंडी - 10 वर्षांपासून नकली नोट बनवण्याच्या ओरोपाखाली फरार असलेल्या आरोपीला देवनार पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. आमिर बनवरकर असं या नकली नोटा बनवणाऱ्या आरोपीचं नाव आहे. तीन वर्ष हा आरोपी फरार होता. त्यानंतर त्याने आपला चेहरा बदलत विविध पत्त्यावर त्याच विभागात वास्तव केल होतं. 2006 साली त्यावेळचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत राजे यांना काही लोक 500-1000 च्या नकली नोटा विकत असल्याची माहिती मिळाली होती. त्यातील 2 आरोपींना अटक करत 11 नोटा पोलिसांनी जप्त केल्या होत्या. मात्र त्यावेळी आमिर पळून जाण्यास यशस्वी झाला होता. सूत्रांच्या माहितीनुसार आमिरवर हत्येचा प्रयत्न करणे, चोरी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Loading Comments