क्रॉफर्ड मार्केट दुर्घटनाःआरोपीला ४ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

चालक आरोपीविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असून न्यायालयाने त्याला ४ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

क्रॉफर्ड मार्केट दुर्घटनाःआरोपीला ४ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी
SHARES

मुंबईत दोन दिवसांपूर्वी क्रॉफर्ड मार्केट परिसरात एका कारने पाच जणांना चिरडल्याची घटना घडली होती. मार्केटच्या जनता हॉटेलसमोर हा अपघात १०० फूट दूर घडला होता. याप्रकरणी पायधुनी पोलिसांनी चालक आरोपीविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असून न्यायालयाने त्याला ४ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचाः- Exclusive : राज ठाकरेंचं 'म्हणणं खरं ठरलं, महाराष्ट्राच्या कारागृहातही परप्रांतीय कैद्यांची गर्दी

 भरधाव वेगात असलेल्या या गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.  सय्यद समीर अली ऊर्फ डिग्गी(४६) असे या कार चालकाचे नाव असून त्यालाही दुखापत झाली आहे. समीर विरोधात ३०४(२),२७९, ३३७,४२७,३०८ भादविसह मोटार वाहन कायदा कलम १८३ व १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलीम हारून मरेडिया(३३) यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मरेडिया हे तेथील एका हॉटेलचे व्यवस्थापक असून त्याच्या डोळ्यासमोर हा प्रकार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचाः- विश्वास नांगरे पाटील मुंबईच्या कायदा व सुव्यवस्था सह आयुक्तपदी

 क्राॅफर्ड मार्केट परिसरात कायमच खरेदीसाठी नागरिक गर्दी करत असतात. रात्री ९ च्या सुमारास या गर्दीच्या ठिकाणी एका कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले, त्यावेळी त्याच्या भरधाव कारने चार जणांना चिरडले, नईम, सरोज, जुबेडा आणि अन्य एका अनोळखी व्यक्तीचा या अपघातात मृत्यू झाला होता. मंगळवारी उपचारादरम्यान अपघातात जमखी झालेल्या कमलेश सिंगचाही मृत्यू झाला.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा