क्रॉफर्ड मार्केट येथे झालेला अपघात फीट आल्याने घडला, चालकाचा दावा

अपघात घडल्यानंतर महिलेला १०० फूट फरफटत नेल्याचेआरोपीने कबूली दिली आहे.

क्रॉफर्ड मार्केट येथे झालेला अपघात फीट आल्याने घडला, चालकाचा दावा
SHARES

क्रॉफर्ड मार्केट परिसरात तीन दिवसापूर्वी एका भरधाव कारने पाच जणांना चिरडल्याने एकच खळबळ उडाली होती. या अपघाताच्या चौकशीत गाडी चालवताना अचानक फीट आल्याने हा अपघात घडल्याचे चालकांकडून पोलिसांना सांगितले आहे. त्यामुळेच अपघात घडल्यानंतर महिलेला १०० फूट फरफटत नेल्याचे आरोपीने कबूली दिली आहे. या प्रकरणी माता रमाबाई मार्ग पोलिस ठाण्याचे अधिकारी तपास करत आहेत.

हेही वाचाः- सरकारला  मंदिर उघडण्याबाबत इतका आकस का?- राज ठाकरे

दक्षिण मुंबईतच्या क्राॅफर्ड मार्केट परिसरात कायमच खरेदीसाठी नागरिक गर्दी करत असतात. २ सप्टेंबर रोजी रात्री ९ च्या सुमारास या गर्दीच्या ठिकाणी एका कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले, त्यावेळी त्याच्या भरधाव कारने चार जणांना चिरडले, नईम, सरोज, जुबेडा आणि अन्य एका अनोळखी व्यक्तीचा या अपघातात मृत्यू झाला आहे. तर या भीषण अपघातात ४ जण गंभीर जखमी झाले असून मोहम्मद जुही, नदीन अन्सारी, कमलेश, मोहम्मद नदीम अशी या चौघांची नावे आहेत. या सर्वांना तातडीने जवळील जे.जे.रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. भरधाव वेगात असलेल्या या गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.  सय्यद समीर अली ऊर्फ डिग्गी(४६) असे या कार चालकाचे नाव असून त्यालाही दुखापत झाली आहे. समीर विरोधात ३०४(२),२७९, ३३७, ४२७,३०८ भादवि सह मोटार वाहन कायदा कलम १८३ व १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलीम हारून मरेडिया(३३) यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मरेडिया हे तेथील एका हॉटेलचे व्यवस्थापक असून त्याच्या डोळ्यासमोर हा प्रकार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचाः- डिसेंबर २०१७ आधी विकलेल्या वाहनांसाठी देखील FASTag अनिर्वाय

या प्रकरणातील चालकाच्या चौकशीत आरोपी चालकाला अपस्माराचा झटका यायचा. गेल्या तीन वर्षांपासून त्याच्यावर यासाठी उपचार सुरू आहेत. अपघात घडला त्यावेळीही त्याला अपस्माराचा झटका  आला होता, असे त्याने चौकशीत सांगितले आहे. पोलिस त्याची सत्यता पडताळत आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा