व्यावसायिकाच्या अाॅफिसमध्ये चोरी, तिघांना अटक


व्यावसायिकाच्या अाॅफिसमध्ये चोरी, तिघांना अटक
SHARES

मुंबईतल्या एका व्यावसायिकाच्या नोकराचे हातपाय बांधून अाणि त्याला बंदुकीचा धाक दाखवून लाखोंची रक्कम चोरणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या गुन्हे शाखा २ च्या पोलिसांनी अावळल्या अाहेत. मे महिन्याच्या अखेरीस घडलेल्या या चोरीचा छडा लावताना पोलिसांनी मोहम्मद युनूस सलाउद्दीन काझी (४०), सलाम उर्फ वासिम मोहम्मद बशीर (२५) आणि राहुल उर्फ मनोज शिवदास गुप्ता (२७) यांना अटक केली आहे.


नेमकं प्रकरण काय ?

महालक्ष्मी मेन्शन खोली क्रमांक ५१ कुंभार तुकडा, भुलेश्वर येथील कार्यालयात प्रकाश रामसेवक मंडल (३५) हे मॅनेजर म्हणून काम पाहतात. प्रकाश हे मालकाने सांगितल्याप्रमाणे एका व्यवसायिकाकडून पैसे घेऊन दुसऱ्या व्यवसायिकाला द्यायचे काम करतात. २९ मे रोजी मंडल हे व्यावसायिक एम. राजेश यांच्याकडून १५ लाख रुपये घेऊन आले आणि कार्यालयात असलेल्या पुजारी या दुसऱ्या व्यवसायिकाला त्यांनी त्यातील पाच लाख रुपये दिले. त्यावेळी मालक काही कामानिमित्ताने कार्यालयातून बाहेर गेले.


... अाणि चोर अात घुसले

कार्यालयातून बाहेर जाताना त्यांनी कार्यालयाचा दरवाजा अर्धवट लावला होता. त्यावेळी व्यावयायिक पुजारी पाच लाखांची रुक्कम कार्यालयात बसून मोजत होते. त्यावेळी एका व्यक्तीने त्यांना पैसे मोजत असताना पाहिले. तो त्याच्या तीन साथीदारांसह कार्यालयात शिरला. यानंतर त्यांनी पुजारी यांना चाकू व पिस्तूलचा धाक दाखवत त्यांच्याकडे असलेले सगळे पैसे आणि आठ हजार रुपयांचे तीन मोबाईल हिसकावले. पुजारी यांचे हात-पाय बांधून कार्यालयाला बाहेरून लॉक लावून चोरटे पळून गेले.


आरोपीच्या चाकूने  सुटका

काही कामानिमित्ताने बाहेर गेलेले प्रकाश मंडल कार्यालयात आल्यानंतर त्यांनी पुजारी यांच्याजवळ आरोपींनी सोडलेल्या चाकूने पुजारींचे हात-पाय सोडवले. याप्रकरणी कार्यालयाचे मालक आणि प्रकाश मंडल यांनी ३१ मे रोजी पोलिसात या आरोपींविरोधात तक्रार नोंदवली होती.



हेही वाचा -

मेट्रोच्या खड्ड्यात पडून मुलीचा मृत्यू

पोलिसांच्या घरफोडीचा प्रयत्न अंगलट



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा