COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
51,38,973
Recovered:
44,69,425
Deaths:
76,398
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
45,534
1,794
Maharashtra
5,90,818
37,236

विश्वासू नोकरानेच तीन कोटीचे दागिने लांबवले

नोकरानेच कागदपत्रांची अफरातफर करत तीन कोटींचे दागिने लांबवल्याची घटना बोरिवलीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी दुकान मालकाने विक्रम बाफना या नोकराविरोधात कस्तुरबा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

विश्वासू नोकरानेच तीन कोटीचे दागिने लांबवले
SHARES

विश्वासू नोकरानेच कागदपत्रांची अफरातफर करत तीन कोटींचे दागिने लांबवल्याची घटना बोरिवलीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी दुकान मालकाने विक्रम बाफना या नोकराविरोधात कस्तुरबा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.


संधीचा घेतला फायदा

बोरीवलीत हेमंत गोल्ड नावाच्या दुकानात बाफना मागील अनेक वर्षांपासून काम करत होता. मालकाच्या गैरहजेरीत तो दुकानाचे सर्व काम व्यवस्थित संभाळत असल्यानं मालकाचा त्याच्यावर पूर्ण विश्वास होता. त्यामुळे अनेकदा मालक त्याच्या विश्वासावर दुकान सोडून महत्त्वाच्या कामांसाठी बाहेर जात. याच संधीचा फायदा बाफनाने घेतला.


संपूर्ण प्रकार

१६ मे ६ जून दरम्यान दुकानाचे मालक काही कामासाठी बाहेर गेल्यानंतर बाफनाने बनावट कागदपत्रांच्या मदतीने कोट्यवधी रुपयांच्या सोन्याची अफरातफर केली. मात्र त्याची ही बनवाबनवी फार काळ टिकू शकली नाही. पैशांचे ऑडिट करताना अंदाजे तीन कोटी रुपयांच्या हिशोब लागत नव्हता.


पोलिसांत तक्रार

चौकशीत बाफनाने केलेल्या अपहार उघडकीस आल्यानंतर मॅनेजर मोहित चौधरीने पोलिसांत तक्रार दाखल केली. मात्र त्या दिवसापासून बाफना फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. अटकेपासून वाचण्यासाठी बाफनाने जामिनासाठी अर्ज केला होता, जो न्यायालयाने फेटाळून लावला. याप्रकरणी कस्तुरबा पोलिस त्याचा शोध घेत आहेत.


हेही वाचा - 

चोरीत अडथळा ठरणाऱ्या कुत्र्याचा काढला काटा

फटका टोळीने घेतला प्रवाशाचा बळी; कळवा स्थानकातील घटना

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा