अबब ! विमानतळावरून एकाच रात्री पाच किलो सोनं जप्त

 Mumbai
अबब ! विमानतळावरून एकाच रात्री पाच किलो सोनं जप्त

मुंबई - विमानतळावरून तब्बल पाच किलो सोनं जप्त झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. एकाच दिवसात पकडण्यात आलेली ही सोन्याची आतापर्यंतची सगळ्यात मोठी जप्ती आहे. एक करोड 77 लाखांच्या तस्करी प्रकरणी कस्टम विभागाने वेगवेगळ्या पाच केसेसमध्ये चार जणांना अटक केली आहे.

शुक्रवारी रात्री दुबईवरून आलेल्या मोहम्मद इलियास उर्मी मुगूकडून कस्टम विभागाने 580 ग्रॅम वजनाची पाच सोन्याची बिस्किटे जप्त केली आहेत. कस्टम विभागाची नजर चुकवण्यासाठी मोहम्मद इलियासने 18 लाखांची ही बिस्किटे आपल्या पार्शवभागात लपवली होती. इस्तानबुलवरून आलेल्या गोखन डेमीर नावाच्या तुर्की नागरीकांकडून कस्टम विभागाने एक किलो वजनाची एकूण तीन सोन्याचे बार जप्त केले. त्याची किंमत 92 लाखांच्या घरात आहे. आपल्या कंबरेवरील पट्यात त्याने ही बिस्किटे अतिशय पद्धतशीरपने लपवली होती.

कस्टम विभागाने अब्दुल इर्शादकडून 1 हजार 160 ग्रॅम वजनाची 10 सोन्याची बिस्किटे जप्त केली आहेत. ज्याची किंमत 35 लाख 80 हजार रुपये आहे. सोन्याच्या या तस्करीत महिला देखील मागे नसून नयना शेख नावाच्या महिलेकडून सात सोन्याच्या बांगड्या जप्त केल्या आहेत. या बांगड्यांची किंमत १२ लाखांच्या घरात आहे. तर हरेश कुकरेजा नावाच्या उल्हासनगरमधील प्रवाशाकडून 1 हजार 400 अमेरिकन डॉलर आणि 95 हजार सौदी रियाल जप्त केले आहेत. परदेशी चलनाची एकूण किंमत साडे अठारा लाखांच्या घरात आहे.

Loading Comments