rumors on social media अफवा पसरवणाऱ्यांविरोधात राज्यात ५०० गुन्हे दाखल , २६२ जणांना अटक

आक्षेपार्ह व्हाट्सअॅप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १९६ गुन्हे दाखल झाले आहेत, तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी २०६ गुन्हे दाखल

rumors on social media  अफवा पसरवणाऱ्यांविरोधात राज्यात ५०० गुन्हे दाखल , २६२ जणांना अटक
SHARES

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, राज्यात सोशल मिडियाच्या माध्यमातून काही समाजकंटक अफवा पसरवून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण करतात. अनेक ठिकाणी या अफवांमुळे सामाजिक तेढ निर्माण होऊ लागल्याने अशा समाज कंटकांविरोधात सायबर पोलिसांनी कडक पाऊल उचलण्यास सुरूवात केली. लाँकडाऊनच्या काळात सायबर पोलिसांनी तब्बल ५०० गुन्हे नोंदवले असून २६२ जणांना आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे.

हेही वाचाः- ICSE board exam : परीक्षा रद्द, विद्यार्थ्यांना दिलासा

राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये लाँकडाऊनच्या काळात ५००  गुन्ह्यांची नोद करण्यात आली आहे. त्यात ३४ अदखलपात्र गुन्ह्यांचा समावेश आहे. आक्षेपार्ह व्हाट्सअॅप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १९६ गुन्हे दाखल झाले आहेत, तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी २०६  गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आक्षेपार्ह टिकटॉक विडिओ शेअर प्रकरणी २७ गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ९ गुन्हे दाखल झाले आहेत, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत. तर अन्य समाज माध्यमांचा गैरवापर केल्या प्रकरणी  ५८ गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत  २६२ आरोपींना अटक केली आहे . तर यापैकी १०७ आक्षेपार्ह पोस्ट्सकाढण्यात आल्या आहेत.

हेही वाचाः- दुर्दैवी! मुंबईत कोरोनामुळे पहिल्या डबेवाल्याचा मृत्यू

  सध्याच्या काळात बरेच लोक समाज माध्यमांचा जास्त प्रमाणात वापर करत आहेत इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची संख्या वाढली आहे .  ऑनलाईन पुस्तके,साहित्य ,गाणी,चित्रपट ,वेबसेरीज व अन्य गोष्टी अधिकृत  संकेतस्थळावरून  विकत घ्यावे किंवा बघावे . अशा गोष्टी अनधिकृत संकेतस्थळांवर बघणे हा कायद्याने गुन्हा आहेच , तसेच अशा संकेतस्थळांवरूनतुमच्या नकळत एखादे मालवेर किंवा संगणक वायरस येऊन तुमचा संगणक किंवा मोबाईल हॅक केला जाऊ शकतो,असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात आले आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा