Advertisement

ICSE board exam : परीक्षा रद्द, विद्यार्थ्यांना दिलासा

आयसीएसई बोर्डानं (सीआयएससीई) दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी यंदाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.

ICSE board exam : परीक्षा रद्द, विद्यार्थ्यांना दिलासा
SHARES

गुरुवारी २५ जून २०२० रोजी आयसीएसई बोर्डानं (सीआयएससीई) दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी यंदाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. सर्वोच्च न्यायालयानं यावरील निर्णय दिला. यावर्षी घेण्यात आलेल्या अंतर्गत परीक्षेच्या गुणांच्या आधारे विद्यार्थी उत्तीर्ण होतील. त्यासाठीचा तपशील लवकरच जाहीर केला जाईल.

आयसीएसई विद्यार्थ्यांसाठी बोर्डाची परीक्षा १ ते १४ जुलै २०२० दरम्यान घेण्यात आली होती. तथापि कोरोनायरस लॉकडाउन दरम्यान आयसीएसई बोर्डानं २०२० साठी घेण्यात येणाऱ्या या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारनंही मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भात याचिका दाखल केली होती. यात परीक्षा रद्द करण्यात याव्यात अशी विनंती करण्यात आली होती. याशिवाय राज्यात या परीक्षेसाठी सरकार परवानगी देऊ शकत नाही, हे देखील स्पष्ट करण्यात आलं होतं.

२५ जून,२०२० रोजी सीबीएसई बोर्डानंही सर्वोच्च न्यायालयात विनंती केली होती. त्यांनीही दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी यावर्षीच्या परीक्षा रद्द करण्याची विनंती केली होती. मागील मूल्यांकन आणि अंतर्गत परीक्षांवरही त्यांना उत्तीर्ण केलं जाईल, असं सीबीएसई बोर्डानं स्पष्ट केलं आहे.

महिन्याच्या सुरूवातीस महाराष्ट्र सरकारनं विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द केल्या. तथापि, राज्यपाल कोश्यारी यांनी सल्लामसलत न करता निर्णय घेण्यात आल्यानं नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयावर त्यांनी टीका करत यावर पुन्हा यावर विचार करण्याचे आदेश दिले.

परंतु, काही आठवड्यांपूर्वी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पुष्टी केली की, विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. नव्या नियमानुसार, मागील गुणांनुसार विद्यार्थ्यांचे सध्याचे मूल्यांकन केलं जाईल. तथापि, पुन्हा परीक्षा घेण्याची इच्छा असल्यास विद्यापीठ या वर्षाच्या शेवटी वेळापत्रक जारी करू शकते.हेही वाचा

CBSC Exams : बोर्डाच्या दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा