वाशीच्या एमजीएम रुग्णालयावर सायबर हल्ला

वाशीतील 'एमजीएम रुग्णालया'तील संगणक हॅक करून सायबर चोरट्यांनी रुग्णालय प्रशासनाकडे 'बिटकाँईन' द्वारे खंडणी मागितली आहे. याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाचे मॅनेजमेंट सिस्टीमचे समन्वयक रामनाथ परमेश्वरम यांनी वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून गुन्हे शाखेचे पोलिस अधिक तपास करत आहेत.

वाशीच्या एमजीएम रुग्णालयावर सायबर हल्ला
SHARES

मुंबई, ठाण्यापेक्षा नवी मुंबईमध्ये आयटी कंपन्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मुंबईसह सायबर चोरट्यांनी नवी मुंबईतील नामंकित कंपनींना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. याचाच प्रत्यय वाशीतील 'एमजीएम रुग्णालया'त आला. या रुग्णालयातील संगणक हॅक करून सायबर चोरट्यांनी रुग्णालय प्रशासनाकडे 'बिटकाँईन' द्वारे खंडणी मागितली आहे. याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाचे मॅनेजमेंट सिस्टीमचे समन्वयक रामनाथ परमेश्वरम यांनी वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून गुन्हे शाखेचे पोलिस अधिक तपास करत आहेत.


संगणक हॅकरकडून हॅक

वाशी सेक्टर-३ मध्ये एमजीएम संस्थेचे न्यू बॉम्बे रुग्णालय असून याच रुग्णालयामधील यंत्रणा रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास अचानक बंद पडली. रुग्णालयातील संगणक अचानक बंद पडल्यामुळे रुग्णालयातील आयटी तज्ज्ञांच्या हालचालींना वेग आला. रुग्णालय व्यवस्थापनाने यंत्रणा पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना यश आलं नाही. त्यावेळी रुग्णालयातील संगणक हॅकरकडून हॅक करण्यात आल्याचं लक्षात आलं.


पैशांची केली मागणी

कालांतराने रुग्णालय प्रशासनाच्या ईमेल आयडीवर आलेल्या एका मेलमधील लिंकमध्ये रुग्णालयातील संगणक पूर्ववत करायचं असल्यास पैशांची मागणी करण्यात आली होती. विशेष म्हणजे हे पैसे बिटकॉइनच्या माध्यमातून हॅकर्सला हवे होते.

वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवल्यानंतर या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपआयुक्त तुषार दोशी यांनी दिली.



हेही वाचा-

भारतात रॅन्समवेअर्स व्हायरसद्वारे हल्ला करण्याचं प्रमाण २० टक्क्यांनी वाढलं

रॅनसमवेअर व्हायरसपासून कसे वाचायचे..? जाणून घेऊया आयटीतज्ज्ञ अच्युत गोडबोलेंकडून



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा