सीबीआयच्या धीम्या गतीवर उच्च न्यायालयाचे ताशेरे


सीबीआयच्या धीम्या गतीवर उच्च न्यायालयाचे ताशेरे
SHARES

मुंबई - नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी सुरू असलेल्या धीम्या तपासाबद्दल मुंबई उच्च न्यायालय चांगलेच संतापले असून सीबीआयच्या तपासावर उच्च न्यायालयाने कडक शब्दात ताशेरे ओढलेत. " सीबीआय गुन्हेगार पकडू शकत नाही हे खळबळजनक असून, हे चालणार नाही असं न्यायमूर्ती धर्माधिकारी यांनी सीबीआयला बजावलं.
हे एका कुटुंबाबद्दल किंवा संस्थेपर्यंत सीमित नसून ही घटना कुणाबरोबरही घडू शकतं असं म्हणत न्यायालयाने सीबीआयला खडसावलं. राजकीय नेते, सामाजिक संस्था कुणीही सुरक्षित नाहीत याचा आपण आनंद मानायचा का असा खडा सवालही उच्च न्यायालयाने सीबीआयला विचारला.
नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि एम. एम. कलबुर्गी यांची हत्या एकाच हत्याराने झाल्याचा संशय सीबीआयने व्यक्त केला होता. स्कॉटलंड यार्डकडून रिपोर्ट देखील मागवण्यात आला होता. मात्र कित्येक महिने उलटल्यानंतरही अहवाल अजूनही प्रतिक्षेतच आहे.
स्कॉटलंड यार्डकडून बेलॅस्टिक अहवाल मिळण्याबाबत सीबीआयने नेमकं कोणतं प्रयत्न केलं, याबाबत प्रतिज्ञापपत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयाने सीबीआयच्या सह संचालकांना दिले. स्कॉटलंड यार्डकडून बेलॅस्टिक रिपोर्ट अद्याप आलेला नसून आणखीन वेळेची मागणी सीबीआयनं केली होती. 16 डिसेंबरला या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा