भायखळा - गणपतीनंतर आता नवरात्री उत्सवाची जय्यत तयारी सुरु झाली आहे. भायखळ्यातील दगडी चाळ ही नवरात्रोत्सवासाठी ही प्रसिद्ध आहे. यावर्षी दगडीचाळीत अमेरिका येथील जगप्रसिद्ध श्री स्वामिनारायण मंदिर साकारण्यात येणार आहे. दरवर्षी या चाळीत अनेक वेगवेगळे देखावे साकारण्यात येतात. यावर्षी ही काही वेगळा देखावा उभा करण्याचा मंडळाचा मानस आहे.