पैशांसाठी जीवघेणी स्टंटबाजी

मुंबई - ट्रेनमध्ये किंवा ट्रेनच्या छतावर जीवघेणा स्टंट करताना आपण स्टंटबाजांना नेहमीच पाहतो. मात्र हा जीवघेणा स्टंट काही तरुण पैशासाठी करत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. हे स्टंट करण्यासाठी या युवकांना पैसे दिले जातात. खांबाला हात लावणे - 5000 रुपये, स्टेशनवर ट्रेनला पकडून प्लॅटफॉर्मवर पाय घासत जाणे 10,000रुपये आणि ओव्हरहेड वायरला हात लावणे 20,000 रुपये असे दर या स्टंटबाजीचे ठरले जातात आणि याचसाठी काही स्टंटबाज आपला जीव धोक्यात घालतात. दरम्यान अशा व्यक्तीवर करडी नजर ठेवल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश अत्री यांनी सांगितले.

Loading Comments