दाऊदच्या साम्राज्याला मोठा झटका, रत्नागिरी पाठोपाठ खेडमधील संपत्तीचा होणार लिलाव

दाऊदच्या रत्नागिरी जिल्ह्यातील त्याच्या मुळगाव असलेल्या खेड तालुक्यातील मुंबके़ आणि खेड शहर तसंच तालुक्यातील लोटे येथील विविध मालमत्तांचा हा लिलाव होत आहे.

दाऊदच्या साम्राज्याला मोठा झटका, रत्नागिरी पाठोपाठ खेडमधील संपत्तीचा होणार लिलाव
SHARES

कुख्यात गुंड  दाऊद इब्राहिमची नुकतीच रत्नागिरी येथील संपत्तीचा लिलाव करण्यात आल्याची घटना ताजी असताना, आता खेडमधील वडिलोपार्जित संपत्तीचा लिलाव करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) याच्या आर्थिक साम्राज्याला मोठा हादरा बसणार आहे.  सफेमा (SAFEMA) च्या कायद्यानुसार हा लिलाव होणार आहे. त्याच्या ७ मालमत्तांची लिलाव १० नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.

हेही वाचाः- बेस्टच्या मदतीसाठी आलेल्या एसटी महामंडळाच्या ताफ्याला महापालिकेनं दिले ३० कोटी

दाऊदची मुंबईतली सर्व संपत्ती SAFEMAने जप्त केली आहे. त्यानंतर आता खेडच्या संपत्तीचा लिलाव होणार आहे. लोकांनी ही संपत्ती घेण्यासाठी उत्सुकता दाखविल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली आहे. SAFEMA चे अधिकारी सय्यद मुनाफ यांनी माहिती दिली की दाऊदच्या १७ मालमत्ता आहेत. कोरोनामुळे ई लिलाव होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. दाऊदच्या रत्नागिरी जिल्ह्यातील त्याच्या मुळगाव असलेल्या खेड तालुक्यातील मुंबके़ आणि खेड शहर तसंच तालुक्यातील लोटे येथील विविध मालमत्तांचा हा लिलाव होत आहे.

या आहेत मालमत्ता

जमीन - राखीव किंमत

२७ गुंठा - २ लाख ५ हजार ८००

२९.३० गुंठा - २ लाख २३ हजार ३००

२४.९० गुंठा - १ लाख ८९ हजार ८००

२० गुंठा - १ लाख ५२ हजार ५००

१८ गुंठा - १ लाख ३८ हजार

३० गुंठा जमिनीवर असलेले घर - ६ कोटी १४ लाख ८ हजार १००

केंद्र सरकारने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर कारवाई करताना २०१८ साली त्याच्या मालमत्तेचा लिलाव करण्यास सुरूवात केली होता. त्यानुसार मुंबईतील मालमत्तेचा लिलाव पहिल्यांदा करण्यात आला होता. या लिलावात मोठ्या प्रमाणात बोली लावण्यात आली होती. सुमारे ३.५१ कोटी रुपयांस या मालमत्तेचा लिलाव करण्यात आला होता. सैफ बुरहानी अपल्फिमेंट ट्रस्टने या जागेसाठी सर्वाधिक बोली लावली होती. आता पुन्हा एकदा केंद्र सरकारने दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या १० नोव्हेंबरला दाऊदच्या महाराष्ट्रातील रत्नागिरी येथील जवळपास ७ मालमत्तांचा लिलाव व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे करण्यात येणार आहे. रत्नागिरी येथील मुंबाके गावात ही मालमत्ता असून या ठिकाणी दाऊदच्या नावावर अनेक जमिनी आणि घर असल्याचे सांगण्यात आलं आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा