प्रसिद्ध लेखकाच्या मुलाकडं खंडणीची मागणी, नग्न छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी

३० मेला तक्रारदाराला इन्स्टाग्रामवर अनोळखी महिलेचा संदेश आला. त्यानंतर काही वेळाने त्या महिलेने व्हिडिओ संदेश पाठवला. त्यात ती महिला नग्न अवस्थेत होती.

प्रसिद्ध लेखकाच्या मुलाकडं खंडणीची मागणी,  नग्न छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी
SHARES

व्हिडिओ कॉलवरील नको त्या अवस्थेतील स्क्रीनशॉर्ट घेऊन तो प्रसारीत न करण्यासाठी  प्रसिद्ध हिंदी मालिकांमधील एका लेखकाच्या मुलाकडं खंडणीची मागणी केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी  याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार २१ वर्षीय तरूण ग्राफिक डिझायनर आहे. ३० मेला तक्रारदाराला इन्स्टाग्रामवर अनोळखी महिलेचा संदेश आला. त्यानंतर काही वेळाने त्या महिलेने व्हिडिओ संदेश पाठवला. त्यात ती महिला नग्न अवस्थेत होती. महिलेने तरूणाशी अश्लील संभाषण करण्यास सुरूवात केली. तिने त्यालाही नग्न होण्यास सांगितलं. त्याने तसं केल्यानंतर काही वेळातच त्याला एका व्हॉट्सअॅप क्रमांकावरून संदेश आला. त्यात या तरूणाचे नग्नावस्थेतील छायाचित्र होते. त्या खाली  २० हजार रुपये न दिल्यास हे छायाचित्र तुझ्या सर्व संपर्कातील व्यक्तींना पाठवण्याची धमकी देणारा संदेशही होता.

घाबरून तक्रारदार तरुणाने संदेशात देण्यात आलेल्या गुगल पे अकाउंटवर दोन हजार रुपये पाठवले व व्हॉट्सअॅपवर संदेश पाठवणा-या व्यक्तीला ब्लॉक केले. त्यानंतर इन्स्टाग्राम संपर्कातील एका महिलेला तक्रारदाराचा नग्नावस्थेतील छायाचित्र आरोपीने पाठवले. त्यानंतर तक्रारदाराने १६ हजार रुपये त्या व्यक्तीच्या गुगल पे अकाउंटवर जमा केले व गुडबाय टीप म्हणून दोन हजार रुपये दिले.

त्यानंतर पुन्हा जून महिन्यात तक्रारदाराला संबंधीत व्यक्तीकडून खंडणीसाठी दूरध्वनी येऊ लागले. त्यानंतरही वारंवार संदेश येऊ लागल्यामुळे त्याने पोलिसांकडे धाव घेतली. दिंडोशी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 



हेही वाचा

 पैशांसाठी तिने सख्या अल्पवयीन बहिणीला विकलं, मानखुर्दमधील धक्कादायक प्रकार


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा