80 हजारांची लाच घेताना पोलिस निरीक्षकाला अटक

गुन्ह्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यासाठी लाच मागणाऱ्या देवनार पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)ने मंगळवारी रंगेहाथ अटक केली. दत्तात्रय गोविंद चौधरी (50) असे या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे.

80 हजारांची लाच घेताना पोलिस निरीक्षकाला अटक
SHARES

गुन्ह्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यासाठी लाच मागणाऱ्या देवनार पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)नं मंगळवारी रंगेहाथ अटक केली. दत्तात्रय गोविंद चौधरी (50) असं  या पोलिस अधिकाऱ्याचं नाव आहे. तक्रारदारानं आरोपीकडे 3 लाख रुपयांची लाच मागितली होती. याचाच पहिला हप्ता घेताना चौधरी यांना अटक करण्यात आल्याची माहिती एसीबी विभागानं दिली आहे. 


नेमकं काय घडलं ?

याप्रकरणातील तक्रारदार आणि त्याच्या भावावर देवनार पोलिस ठाण्यात  मारहाणीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. या गुन्ह्यात तक्रारदारासह त्याच्या भावाला अटक केल्यानंतर न्यायालयानं त्यांना जामीन मंजूर केला. मात्र याप्रकरणातून तक्रारदार आणि त्याच्या भावाला पूर्णपणे बाहेर काढण्यासाठी चौधरी यांनी तीन लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास या प्रकरणात अडकवण्याची धमकी चौधरी यांनी दिल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. मात्र तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यानं एसीबीकडे तक्रार नोंदवली होती. त्यानुसार मंगळवारी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून चौधरी यांना लाचेचा पहिला हप्ता 80 हजार रुपये स्विकारताना रंगेहाथ अटक केली.



हेही वाचा

४ वर्षाच्या मुलाला गळफास देऊन आईचीही आत्महत्या

डॉली बिंद्रा विरोधात आणखी एक गुन्हा दाखल



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा