न्यू डीएननगर प्रकल्पाप्रकरणी विकासकाला अटक

 Pali Hill
न्यू डीएननगर प्रकल्पाप्रकरणी विकासकाला अटक

मुंबई - गेल्या 11 वर्षांपासून रखडलेल्या न्यू डी. एन. नगर पुनर्विकास प्रकल्पाप्रकरणी सुरुवातीचे विकासक गुरुनाथ फोंडेकरला आर्थिक गुन्हे शाखेने 15 नोव्हेंबरला अटक केलीय. त्याला 21 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. फोंडेकर हे वैदेही आकाश प्रा.लि.चे संचालक असून प्रकल्पातील इमारतींची सी. सी. प्राप्त झालेली नसतानाही त्यातील फ्लॅट आणि दुकानं व्यावसायिक धरमशी पटेल यांना विक्री केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

धर्मशी पटेल या व्यावसायिकानं या घरांसाठी तसंच दुकानांसाठी तब्बल सात कोटी 70 लाख रुपये मोजले होते. मात्र त्यानंतर फोंडेकर यांच्याकडे ही मालमत्ता विकण्याची परवानगी नसल्याचं समोर आल्यानंतर व्यावसायिकानं डीएननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा दाखल होण्याच्या काही दिवसातच फोंडेकरने आर्थिक गुन्हे शाखेत न्यू डीएननगर को. ऑप. हाऊसिंग सोसायटी, पदाधिकारी आणि डेव्हलपरविरोधात नुकसान आणि फसवणुकीची तक्रार दाखल केली. 

Loading Comments