हेलिकॉप्टर दुर्घटनेच्या तपासात अडचणी


हेलिकॉप्टर दुर्घटनेच्या तपासात अडचणी
SHARES

मुंबई - आरे कॉलनीत झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेचा तपास कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डर आणि फ्लाईट डेटा रेकॉर्डर नसल्यानं कठीण होऊन बसलाय. कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डर हा फ्लाईट च्या दरम्यान पायलट आणि एटीसीमधील संभाषण तसेच पायलट जे काही बोलतो ते रेकॉर्ड करतो. तर फ्लाईट डेटा रेकॉर्डर हा फ्लाईट दरम्यान घडलेल्या प्रत्येक तांत्रिक बाबींचा लेखाजोखा रेकॉर्ड करून ठेवतो पण या दोन्हीच्या नसण्यानं अमान एव्हिएशनच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय होऊन बसलं हे ओळखणं जड होऊन बसलंय. रॉबिन्सन ४४ एस्ट्रो जातीचं हे हेलिकॉप्टर हे अतिशय छोटेखानी हेलिकॉप्टर असून, नियमानुसार या हेलिकाप्टरमध्ये कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डर आणि फ्लाईट डेटा रेकॉर्डर असण्याची गरज नाही.
या हेलिकॉप्टर दुर्घटनेच्या चौकशीसाठी Aircraft Accident Investigation Board (AAIB) ची टीम मुंबईत दाखल झाली असून, त्यांनी चौकशीला सुरुवात केलीय. या टीमनं आरे कॉलनीतील पाहणी केली असून, यावेळी Aircraft Accident Investigation Board (AAIB) च्या टीमनं सेव्हन हिल हॉस्पिटला भेट देऊन दुर्घटनेत जखमी झालेल्या संजीव शंकर यांची देखील या टीमने चौकशी केली.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा