स्वाती साठे यांना नडला व्हॉट्सअॅपचा नाद

 Mumbai
स्वाती साठे यांना नडला व्हॉट्सअॅपचा नाद

व्हॉट्सअॅपच्या वेडापोटी कित्येकांनी आपले जवळचे मित्र गमावले, अनेकांना नोकरीवर पाणी सोडावे लागले, तर काहींना चक्क घटस्फोटाचाही सामना करावा लागला. व्हॉट्सअॅपचा हाच नाद कारागृह विभागाच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनाही नडल्याने त्यांना मंजुला शेट्ये हत्येच्या तपासातून अंग काढून घ्यावे लागले आहे.

हा तपास आता कारागृह विभागाचे अतिरिक्त महानिरिक्षक राजवर्धन सिंह यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.


नामुष्की ओढावली

व्हॉट्सअॅपवर उधळलेली मुक्ताफळे प्रसार माध्यमात येताच मंजुला शेट्ये हत्येच्या तपासातून काढता पाय घेण्याची नामुष्की साठे यांच्यावर ओढवली. त्यातूनच शुक्रवारी स्वाती साठे यांनी स्वतः अप्पर पोलिस महासंचालकांना पत्र लिहून आपल्याकडून हा तपास काढून घेण्याची मागणी केली.मदतीचे आवाहन

मंजुला शेट्ये हत्याप्रकरणात जिल्हा कारागृह अधिक्षक मनिषा पोखरणकर यांच्यासह सहा जणांना अटक केल्यानंतर कारागृह विभागाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर साठे यांनी या अधिकारी-कर्मचाऱ्यांना मदत करण्याचे आवाहन केले. 'आपण जेलकर्मी अधिकारी आणि कर्मचारी भगिनींना भक्कम आधार देऊ’, असे या मेसेजमध्ये त्यांनी म्हटले आहे.


मीडियाचा आत्मा शांत होईल का?

त्याच बरोबरच या प्रकरणात सहा पोलिसांना अटक केल्यानंतर तरी मीडियाचा आत्मा शांत होईल का? असा वादग्रस्त सवालही त्यांनी इतरांना याच व्हॉऱ्अॅसप ग्रुपवर विचारला होता.मुख्यमंत्र्यांना पत्र

हा मेसेज ठाणे कारागृहाचे निलंबित अधिक्षक हिरालाल जाधव यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून साठे यांच्यावर कारवाईची मागणी केली. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात जाधव यांनी स्वाती साठे कारागृह अधिकाऱ्यांकडून कशा प्रकारे पैशांची जमवाजमव करत आहेत, याचा सगळा लेखाजोखा मांडला.

हा व्हॉट्सअॅप मेसेच व्हायरल झाल्यानंतर तसेच प्रसार माध्यमांनी हे प्रकरण उचलून धरल्यावर काही वेळातच स्वाती साठे यांनी या तपासातून नाव काढून घेण्याची मागणी केली.


आरोपींना 7 दिवसांची कोठडी

दरम्यान, मंजुला शेट्येच्या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले तिथे न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. आम्हाला आणखीन कैद्यांची समोरासमोर बसून जबानी घ्यायची असल्याचे पोलिसांनी सांगितले.


 


हे देखील वाचा - 

मंजुलावर तुरुंगात लैंगिक अत्याचार - इंद्राणीडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Loading Comments