अॅन्टॉप हिल परिसरातील वसाहतींची दुरवस्था

 Mumbai
अॅन्टॉप हिल परिसरातील वसाहतींची दुरवस्था

सायन - अॅन्टॉप हिल इथल्या सी.जी.एस वसाहतीतील काही इमारतींची दुरवस्था झाली आहे. गेल्या 20 वर्षांपासून या वसाहतींकडे दुर्लक्ष केलं गेलंय. तसंच याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दुल्यांचांही वावर असतो. याबाबतीत सीपीडब्लूडीकडे तक्रार केली असता त्यांनी तेवढ्यापुरतेच तिथे लक्ष घातलं असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. तर, या परिसरात असलेल्या 2 पडीक इमारतींना पाडलं आहे. स्थानिकांच्या तक्रारीनुसार येत्या 10 दिवसांतच आम्ही उर्वरित इमारतीही तोडू असं सीपीडब्लूडीचे दुय्यम अभियंता भूषण भेंडे यांनी सांगितलं. तसंच येत्या 10 दिवसांत पडिक इमारती पाडून त्यावर नवीन बांधकाम केलं जाणार की नाही हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही.

Loading Comments