सोने तस्करीप्रकरणी ज्वेलरला अटक, १८० किलो सोनं जप्त

कोलकाताहून हावडा एक्स्प्रेसने मुंबईत अवैधरित्या सोनं येणार असल्याचं माहिती डीआरआयला मिळाली होती. डीआरआयने गोपा राम या प्रवाशाला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्याकडे ६.९ किलो सोने सापडले.

SHARE

काळबादेवी येथील एका ज्वेलरने अवघ्या दहा महिन्यांमध्ये तब्बल १८० किलो सोन्याची तस्करी केल्याचं समोर आलं आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) सोमवारी साहिल जैन (२३) या ज्वेलरला अटक केली. साहिलकडे सापडलेल्या सोन्याची किंमत ६६ कोटी रुपये आहे. 

कोलकाताहून हावडा एक्स्प्रेसने मुंबईत अवैधरित्या सोनं येणार असल्याचं माहिती डीआरआयला मिळाली होती. डीआरआयने गोपा राम या प्रवाशाला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्याकडे ६.९ किलो सोने सापडले. गोपा राम रविवारी सकाळी ७.३० वाजता हावडा एक्स्प्रेसने लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.  गोपा राम हे सोनं साहिल जैनला देण्यासाठी येत होता. हे सोनं बांग्लादेशमधून आणण्यात येत असल्याची माहिती त्याने दिली. 

गोपा रामच्या माहितीवरून डीआरआयने  साहिल जैनला अटक केली. गोपा रामने आणलेलं सोनं विदेशी बनावटीचं आहे. त्यावर कोणतंही मार्किंग केलेलं नाही. सोने तस्करीत जैन हा एकटाच होता की त्याचे आणखी कुणी साथीदारही आहेत, हे शोधण्याचा आता डीआरआय प्रयत्न  करत आहे. हेही वाचा -

कुर्लामध्ये साप चावल्याने पोलिसाचा मृत्यू

आता मुंबई पोलिस घालणार घोड्यावरून गस्तसंबंधित विषय
ताज्या बातम्या