तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

 Mumbai
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

धारावी- आपल्या राहत्या घरात एका तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली. महेश गुजलप्पा बालमनूर (३५) असं त्या मृत तरुणाचे नाव असून तो धारावीतल्या पीएमजीपी कॉलनीतील ४-ब इमारतीत राहत होता.

पहाटे संपूर्ण कुटूंब गाढ झोपेत असताना त्याने पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला. सकाळी शाळेत जाण्यासाठी उठलेल्या मुलीने त्याला पाहिल्याने घटना उघडकीस आली. घटनेची खबर मिळताच धारावी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि चौकशी करून मृत्यूदेह ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी सायन रुग्णालयात पाठवला. गेल्या काही महिन्यांपूर्वी धारावी झोपडपट्टीत राहणाऱ्या महेश यांचे राहते घर म्हाडाकडे ठोस पुरावे सादर न केल्यानं अपात्र ठरवून पाडण्यात आले होते. आपल्या आयुष्यभराची कमाई एका झटक्यात गेल्याने तेव्हापासून तो प्रचंड तणावाखाली होता. या दरम्यान घरच्यांनी त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला. मात्र एका क्षणात सुखाचा संसार मातीमोल झाल्याचं त्याच्या जिव्हारी लागलं आणि त्यानं आपलं आयुष्य संपवलं.

Loading Comments