Advertisement

आॅपरेशनवेळी आवश्यकता नसेल तर दाढी काढू नये, रईस शेख यांचं पालिका आयुक्तांना पत्र


आॅपरेशनवेळी आवश्यकता नसेल तर दाढी काढू नये, रईस शेख यांचं पालिका आयुक्तांना पत्र
SHARES
Advertisement

मुंबई महानगर पालिकेच्या रूग्णालयांमध्ये  छोट्या शस्त्रक्रियेसाठी गरज नसतानाही रूग्णाची दाढी काढली जाते.  मुस्लिम धर्मामध्ये दाढी ठेवणं ही धार्मिक परंपरा असताना मुस्लिम रूग्णांची दाढी गरज नसताना शस्त्रक्रियेवेळेस काढली जात असल्याचं म्हणत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अबू अाझमी यांच्यापाठोपाठ नगरसेवक रईस शेख यांनी याला आक्षेप घेतला आहे. तर गरज नसताना शस्त्रक्रियेवेळेस दाढी काढू नये, रूग्णांच्या कुटुंबियांच्या परवानगीनेच दाढी काढावी यासंबंधीचा निर्णय पालिकेने घ्यावा, असं पत्रही शेख यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांना दिलं आहे.


मुस्लिम रूग्णांची तक्रार 

छोटी वा मोठी कुणतीही शस्त्रक्रिया करताना रुग्णांच्या संपूर्ण चेहऱ्यावरील केस काढले जातात. पालिका रूग्णालयामध्ये मुस्लिम रूग्णाची वा रूग्णाच्या नातेवाईकांची परवानगी न घेता केस, दाढी काढली जाते. मुस्लिम धर्मामध्ये दाढीचं अनन्य साधारण महत्त्व आहे. असं असताना गरज नसताना छोट्या शस्त्रक्रियेसाठीही दाढी काढली जात असल्याची तक्रार मुस्लिम रूग्णांची अाहे. 


समाजात वावरणं कठीण

त्यामुळे पालिका रूग्णालयात गरज असल्यास दाढी काढली जावी वा रुग्णाच्या कुटुंबियांची परवानगी घेतच दाढी काढली जावी, अशी मागणी शेख यांनी केली आहे. तर यासंबंधीचा निर्णय घेत तसे आदेश पालिका रूग्णालयांना द्यावे असंही त्यांनी म्हटलं आहे. तर दाढी काढल्यानंतर रूग्णाला आणि त्याच्या कुटुंबियाला समाजात वावरणं कठीण होतं, त्याचा त्यांना मोठा त्रास होतो असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे.हेही वाचा - 

सोमवारी रात्रीपासून ३० हजार बेस्ट कर्मचारी संपावर
संबंधित विषय
Advertisement