शॅम्पू वापरल्यानं मालकाची मोलकरणीला मारहाण

चारकोप - कांदिवलीच्या चारकोप परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलीय. घरात काम करणाऱ्या मोलकरणीनं शॅम्पू वापरला म्हणून मालकाकडून मारहाण करण्यात आलीय. तसंच ती चोर असल्याचं सांगत तिचे फोटो व्हॉट्सअॅपवर व्हायरल केलेत. याप्रकरणी मोलकरणीनं चारकोप पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी मालक संजय अग्रवाल आणि पत्नी सुनिता अग्रवाल यांची चौकशी सुरू केलीय.

Loading Comments