दाभोलकर-पानसरे हत्या प्रकरण, १८ नोव्हेंबरपर्यंत आरोपपत्र


दाभोलकर-पानसरे हत्या प्रकरण, १८ नोव्हेंबरपर्यंत आरोपपत्र
SHARES

अंनिसचे डाॅ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड पानसरे यांच्या हत्ये प्रकरणी सात आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. मात्र कित्येक दिवस उलटूनही सीबीआयने आतापर्यंत आरोपपत्र का सादर केलं नाही?, असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. त्यावेळी अटक आरोपींविरोधात १८ नोव्हेंबर रोजी आरोपपत्र न्यायालयात सादर करणार असल्याची माहिती सीबीआयने न्यायालयाला दिली.


गुन्ह्यांचा तपास सीबीआयकडे

डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात दुचाकीहून आलेल्या दोघांनी गोळया घालून हत्या केली. या हत्येचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले. त्यामागोमाग पुरोगामी चळवळीचे विचारवंत गोविंद पानसरे यांची २० फेब्रुवारी २०१५ हत्या करण्यात आली. या दोन्ही गुन्ह्यांचं गांभीर्य लक्षात घेता. या गुन्ह्यांचा तपास हा सीबीआयकडे सोपवण्यात आला. मात्र सीबीआयच्या हाती ठोस असे पुरावे हाती लागत नव्हते. दरम्यान लेखिका गौरी लंकेश यांची ५ सप्टेंबर २०१७ रोजी हत्या करण्यात आली.


हत्यांमध्ये अनेक गोष्टी साम्य

या तिन्ही हत्यांमध्ये अनेक गोष्टी साम्य होत्या. त्या आधारावर कर्नाटक पोलिसांनी अमोल काळे याला अटक केली. अमोलच्या चौकशीतून सात जणांची नावं पुढे आली. त्यानंतर सीबीआय तपासात या सर्वांचा या तिन्ही हत्याकांडात समावेश निश्चित झाला.

सीबीआयने अमोल काळेच्या चौकशीतून पुढे आलेलं नाव सचिन अंदुरे असून यानेच ही हत्या केल्याचा दावा न्यायालयात केला आहे. लवकरच सीबीआय आणि पानसरे हत्याकांडात तपास करत असलेली एसआयटी या दोन्ही हत्याप्रकरणाचा प्रगती अहवाल न्यायालयात सादर करणार आहेत. हा अहवाल २२ नोव्हेंबरला सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा