Exclusive : अशी आहे डाॅ. पायल तडवीची सुसाइड नोट, वाचा...

हे अत्याचार संपणार नाहीत याची खात्री पटली आहे. आणि दुसरा कोणताही मार्ग माझाजवळ नाही. मी अशा ठिकाणी अडकली आहे जे मला दररोज सहन करायचं आहे. मात्र ते कधीही बदलणार नाही. माझ्या खासगी गोष्टीतही आता ते डोकावू लागले आहेत.

Exclusive : अशी आहे डाॅ. पायल तडवीची सुसाइड नोट, वाचा...
SHARES
नायर रुग्णालयातील डाॅ. पायल तडवी हिने २२ मे रोजी होस्टेलमध्ये वरिष्ठ डाॅक्टरांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्याचे पडसाद देशभर उमटले. पायलच्या मोबाइलमध्ये तिने लिहिलेल्या सुसाइड नोटमुळे हे प्रकरण पुढे आलं. पायलने लिहिलेली हीच सुसाइड नोट 'मुंबई लाइव्ह'च्या हाती लागली असून नेमकं तिने या सुसाइड नोटमध्ये काय म्हटलं ते पाहुया ...



पायलने काय म्हटलं सुसाइड नोटमध्ये?


आईबाबा माफ करा मला मी हे टोकाचे पाऊल उचलत आहे. मला माहीत आहे मी तुमच्यासाठी किती महत्वाची आहे आणि माझासाठी तुम्ही किती कष्ठ घेतले आहेत. मात्र मला आता सहन होत नाही. मी एक मिनिटही आता त्यांच्यासोबत राहू इच्छित नाही. मागच्या एक वर्षापासून आम्ही दोघी सहन करत आहोत. असं वाटलं कधी तरी हे संपेल. मात्र  हे अत्याचार संपणार नाहीत याची खात्री पटली आहे. आणि दुसरा कोणताही मार्ग माझ्याजवळ नाही. मी अशा ठिकाणी अडकली आहे जे मला दररोज सहन करायचं आहे. मात्र ते कधीही बदलणार नाही. माझ्या खासगी गोष्टीतही आता ते डोकावू लागले आहेत. मी सर्व करून पाहिलं मात्र सर्वच ठिकाणी अपयश आलं.  मी एकटी पडली असून डिपार्टमेंटमध्ये माझा मदतीसाठी कुणी येत नाही.  सगळे मलाच दोषी ठरवत त्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी समजावत आहेत. मी यासाठी ही फिल्ड निवडली की, माझं ते लहानपणापासूनचं स्वप्न होतं. या काॅलेजमध्ये यासाठी अॅडमिशन घेतलं की, या काॅलेजमध्ये मला काही तरी चांगलं शिकायला मिळेल. मात्र अपेक्षेप्रमाणे तसं न घडता येथे सर्वांनी आपले रंग दाखवले. 


सुरूवातीला मी आणि स्नेहलने सर्व काही सहन केलं. मात्र त्याची तक्रार कुठेही केली नाही. त्रास इतका वाढला की तो आता सहन होत नाही. मी तक्रारही केली. मात्र त्याचे पुढे काहीच झालं नाही.  दररोज त्रास वाढतच होता. मात्र कमी होत नव्हता. मी दररोज सर्वांसमोर ते सहन केलं. याचा माझ्या कामावर आणि  खासगी आयुष्यावरही परिणाम झाला.  त्यातून मी एवढंच शिकले की, हे जोपर्यंत सुरू राहणार त्यातून काही शिकता येणार नाही. मला जाणूनबुजून पीएमसी वार्डमध्ये ठेवले जायचे. जेणेकरून गायनाकचे शिक्षण मला घेता येणार नाही. मला मागच्या तीन आठवड्यापासून लेबर रुममध्ये पाठवले जात नाही. कारण त्यांना मी त्या कामाची वाटत नाही. मला  ओपीडीच्या काळात लेबर रुमपासून लांब राहण्यास सांगितले. ते मला रुग्णांनाही पाहू देत नव्हते. मात्र संगणकावर फक्त इंट्री करायला लावायचे. ते एक क्लर्कचा भाग आहे. हे सर्व करूनही परिस्थिती काही बदलत नव्हती आणि मनातून माझे खच्चीकरण होत होते. येथील वातावरण शिकण्यासाठी पोषक नाही. आणि होप्सही सोडले आहेत. कारण मला माहित आहे यांच्या वागण्यात काही फरक पडणार नाही.

जोपर्यंत मी बोलणार नाही तोपर्यंत काही बाहेर येणार नाही. माझ्या व स्नेहलच्या या सर्व परिस्थितीला जबाबदार डाॅ. हेमा अहुजा, भक्ती मेहरा,  अंकिता खंडेलवाल यांना धरते. मी मला होणाऱ्या त्रासाबाबत अनेक वरिष्ठांकडे दाद मागितली. मात्र त्याचे काही झाले नाही. मला खरचं पुढे कुठलाही मार्ग दिसत नाही. दिसते ते फक्त  माझा अंत.... मी माझे पालक आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्यांची माफी मागते. मला हे नाही माहित स्नेहल त्या तिघींसोबत कशी राहील. मला माफ कर स्नेहल मी तुला त्यांच्यात एकटीला सोडत आहे.


सुसाइड नोट पायलचीच

पायलच्या मोबाइलमध्ये मिळालेल्या सुसाइड नोडवर ही नोट तिनेच लिहिली आहे का?  या बाबत प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे पोलिसांनी पुण्याच्या हस्ताक्षर तज्ञांकडे ती पाठवून तपासली असता त्यांनी ही नोट पायलनेच लिहिली असल्याचा अहवाल पोलिसांकडे सादर केला आहे.




 
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा