पुरातन मूर्तींची तस्करी करणाऱ्यांविरोधात डीआरआयने फास आवळला


पुरातन मूर्तींची तस्करी करणाऱ्यांविरोधात डीआरआयने फास आवळला
SHARES

देशातील पुरातन मूर्तींची तस्करी करणाऱ्या अनिवासी भारतीय आरोपींविरोधात आता डीआरआयने कारवाईचा फास आवळण्यास सुरूवात केली आहे. विजय नंदा आणि उदित जैन अशी या दोघींची नावं आहेत. परदेशी नागरिकत्व असलेल्या या आरोपींविरोधात सीमाशुल्क विबागाचे अधिकारी आता कायद्यांतर्गत ही प्रक्रिया करणार आहे.


नंदांच्या घरी कारवाई

देशातील १३ पुरातन मूर्तींची तस्करी अमेरिका, लंडन आणि हाँगकाँग येथे करणार असल्याची माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार गोरेगाव येथील नंदा यांच्या घरावर कारवाई करत डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी १३ पुरातन मूर्ती जप्त केली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी पहिल्या शतकातील टेराकोटाच्या मूर्ती, १७ आणि १८ व्या शतकातील महिषासूरमर्दिनीच्या मूर्ती, गणेशाच्या कांस्यमूर्ती, तसेच १൦-११ व्या शतकातील दक्षिण भारताच्या मंदिरातून उखडून आणलेल्या वरद गणेश, पद्मपाणी, अवलोकितेश्वर, उभा विष्णू, नाग-नागीन आदी मूर्ती त्यांच्याकडून जप्त करण्यात आल्या होत्या.


१६ कोटी १८ लाखांचा दंड

२५ जुलैला सीमाशुल्क विभागाने डीआरआयच्या तपासात पुढे आलेल्या या माहितीवर शिक्कामोर्तब केलं. त्यानुसार नंदा यांच्याकडून १६ कोटी १८ लाखांचा दंड आकारण्यात आला. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या तीन कोटी किमतीच्या ४७ मूर्ती जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या मूर्ती परदेशात नेण्यासाठी नंदाला मदत करणाऱ्या कंपनीलाही संबंधित विभागाने दंड आकारला आहे.


दोन मूर्ती गुजरातमधून चोरल्या

उत्तम शिल्पकार असलेल्या जैनने २൦१५ मध्ये नंदासाठी प्रथम काम करण्यास सुरुवात केली. जैनने नंदासाठी कांस्यमूर्ती, गुप्तकालीन सात सोन्याच्या अंगठ्या आदी पुरातन वस्तू हाँगकाँगला पाठवल्याचं तपासात पुढे आलं आहे. याशिवाय पार्वती आणि गणपतीच्या दोन मूर्ती गुजरातमधून चोरण्यात आल्याचा संशय त्यांच्यावर आहे. त्यासाठी नंदा नवी दिल्लीत जैनला भेटला होता. प्रत्येकी मूर्तीमागे जैनला २५ हजार रुपये दिले जात होते.



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा