मालकाने पगार दिला नाही म्हणून नोकराने गाड्याच जाळल्या


मालकाने पगार दिला नाही म्हणून नोकराने गाड्याच जाळल्या
SHARES

मालकाने कामाचे पैसे न दिल्याने बदला घेण्यासाठी आरोपी ड्रायव्हरने मालकाच्या पाच बसगाड्या जाळल्याची माहिती समोर आली आहे. या जळीतकांडात बस मालकाचं तब्बल तीन कोटींच नुकसान झालं आहे. मुंबई पोलिसांनी शनिवारी आरोपी ड्रायव्हरला अटक केली आहे.

हेही वाचाः- मुंबईत परजिल्ह्यातून येणारे दूध भेसळमुक्त; दुधाचा दर्जाही  कमी प्रतीचा

या घटनेतील आरोपीचं नाव अजय सारस्वत असं असून तो २४ वर्षांचा आहे. कोरोना साथीच्या काळात आरोपीनं मुंबईतील आत्माराम ट्रॅव्हल एजन्सीमध्ये ड्रायव्हर म्हणून दहा दिवस काम केलं होतं. त्याने गेल्या एका महिन्याच्या काळात आत्माराम ट्रॅव्हल एजन्सीच्या पाच बसगाड्या आगीच्या हवाली केल्या आहेत. २४ डिसेंबर २०२० रोजी आरोपीनं तीन बसगाड्या जाळल्या होत्या, तर २१ जानेवारी २०२१ रोजी दोन बसगाड्या जाळल्या होत्या. केवळ आत्माराम ट्रॅव्हल एजन्सीच्या गाड्यांनाच आग का लागते? यामुळे पोलिसांना संशय आला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केल्यानंतर संबंधित प्रकरण समोर आलं आहे.

हेही वाचाः- मुंबईतील हवेची गुणवत्ता घसरतेय..!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्माराम ट्रॅव्हल एजन्सीच्या काही बसेसच्या बॅटऱ्या खराब झाल्या होत्या. त्यामुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज नोंदवला होता. परंतु एका महिन्यानंतर घटनेची पुनरावृत्ती झाल्याने पोलिसांना या घटनेबाबत संशय आला. तसेच ट्रॅव्हल एजन्सीच्या मालकाने आपल्या एका ड्रायव्हरवर संशय असल्याचं पोलिसांना सांगितलं. त्यानंतर मुंबई पोलिसांनी तपास करत आरोपीला अटक केली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा