दहशतवादी हल्ल्याचे सावट, मुंबईत ड्रोन, पॅराग्लायडर्स, एअरक्राफ्टवर बंदी

या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध भा.द.वि. १९६० कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येईल, असे या आदेशात म्हटले आहे.

दहशतवादी हल्ल्याचे सावट, मुंबईत ड्रोन, पॅराग्लायडर्स, एअरक्राफ्टवर बंदी
SHARES

मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात २९ डिसेंबर २०२० पर्यंत ड्रोन, पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोलवर चालणारे मायक्रो लाईट एअर क्राफ्ट, एरिएल मिसाईल आदी उपकरणांवर बंदी घालण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.मुंबई पोलीस उपआयुक्त (संचलन) तथा कार्यकारी दंडाधिकारी एस.चैतन्य यांनी उपरोक्त आदेश निर्गमित केले असून,या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध भा.द.वि. १९६० कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येईल, असे या आदेशात म्हटले आहे.

हेही वाचाः- लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी कार्यालयांच्या वेळा बदलण्याची गरज

महाराष्ट्राच्या गुप्त विभागाला शंका आहे की, देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये पुन्हा एकदा मोठा दहशतवादी हल्ला होऊ शकतो. यावेळी हा हल्ला ड्रोन किंवा मिसाइलच्या माध्यमातून केला जाऊ शकतो. गुप्तचर विभागाच्या पत्रानंतर मुंबई पोलिसांनी अलर्ट जारी करुन शहराच्या सर्व प्रमुख स्थानांच्या सुरक्षेच्या सूचना दिल्या आहेत. मुंबई पोलिसांच्या डिप्टी कमिश्नर (ऑपरेशन) च्या कार्यालयाने जारी केलेल्या सतर्कतेनुसार दहशतवादी आणि राष्ट्रद्रोही लोक ड्रोन, रिमोट ऑपरेट मायक्रो लाईट एअरक्राफ्ट, एरियल मिसाईल किंवा पॅरा ग्लायडरच्या माध्यमातून हा हल्ला करू शकतात. अलर्टमध्ये ही देखील शंका व्यक्त केली आहे की, दहशतवादी गर्दीच्या ठिकाणी आणि व्हीव्हीआयपीला निशाणा बनवू शकतात. कायदा व्यवस्था बिघडवण्यासोबतच सार्वजनिक संपत्तीलाही नुकसान पोहोचवले जाऊ शकते.

हेही वाचाः- पालघर, सफाळे स्थानकात प्रवाशांचा रेल रोको

गुप्तचर विभागाचे इनपुट लक्षात घेता पोलिसांनी मुंबईमध्ये कोणत्याही फ्लाइंग ऑब्जेक्ट (उडवले जाणारे उपकरणे इत्यादी)वर बंदी घातली आहे. पोलिसांनुसार हा आदेश पुढचा आदेश येईपर्यंत किंवा एक महिना लागू राहिल. जर एखाद्या व्यक्तीने नियमांचे उल्लंघन केले तर त्याच्याविरोधात आयपीसीची कलम-१८८ नुसार केस दाखल केली जाऊ शकते.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा