मुंबई लोकलमध्ये दिव्यांगला जाळण्याचा प्रयत्न , मुंब्रा स्थानकाजवळील घटना

ही घटना रात्री 11.30 च्या सुमारास घडली असून पीडितेला उपचारासाठी बेड मिळेपर्यंत जवळपास 12 तास गेले.

मुंबई लोकलमध्ये दिव्यांगला जाळण्याचा प्रयत्न , मुंब्रा स्थानकाजवळील घटना
SHARES

मुंबईमध्ये धावत्या लोकल ट्रेनमध्ये एका दिव्यांग (मूकबधिर ) व्यक्तीला जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नशेसाठी वापरणाऱ्या सोल्युशनने दिव्यांगला जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे.

उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण रेल्वेत कळवा-मुंब्रा स्थानकादरम्यान घटना घडली ही धक्कादायक घटना घडली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

नशेसाठी वापरण्यात येणारे सोल्युशन हातावर टाकून दिव्यांगाला पेटवून दिले. यामध्ये त्याचा हात पूर्णपणे भाजला आहे. त्याचे नाव प्रमोद वाडेकर असे आहे. जखमीवर केईएममध्ये उपचार सुरू आहेत. हल्ला करणाराही दिव्यांग असून हल्ल्यानंतर मुंब्रा स्थानकात उतरून गेल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज स्थानकावरून कल्याणला जाणाऱ्या लोकलमध्ये मूकबधिर प्रमोद वाडेकरवर ज्वलनशील पदार्थ टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. प्रमोद हा मुंबईतील एका हॉटेलमध्ये काम करतो. कामावरून लोकलने दिवामधील आपल्या घरी परतत असताना ही घटना घडली.

मुंब्रा स्टेशनजवळ विकलांग डब्यामध्ये एका अज्ञात इसमाने प्रमोदच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून त्याला जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. जखमी प्रमोदवर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत, मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्याची माहिती प्रमोद वाडेकर यांचा भाऊ प्रसाद वाडेकर यांनी दिली आहे.

ठाणे रेल्वे पोलिसांनी मुंब्रा स्थानकातील सीसीटीव्ही चित्रे तपासल्यानंतर आरोपीवर गुन्हा दाखल केला असून संशयिताचा शोध घेतला जात आहे. त्याला शेजारच्या प्लॅटफॉर्मवरून ठाण्यासाठी दुसऱ्या ट्रेनमध्ये चढताना सीसीटीव्हीमध्ये पाहिले आहे, असे पोलिसांनी सांगितले.



हेही वाचा

मुंबई-सोलापूर आणि मुंबई-शिर्डी वंदे भारत ट्रेन सुपरहिट!

नवी मुंबईहून गेट वे ऑफ इंडिया आणि अलीबागसाठीची स्पीडबोट सेवा बंद

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा