पोटात लपवून आणले जात होते ड्रग्ज

केनियातून हे माफिया एखाद्या तस्कराला एक किलोचे कोकेन छोट्या छोट्या केप्सूलमध्ये भरून ते केप्सूल तस्कराला गिळून भारतात पाठवायचे.

पोटात लपवून आणले जात होते ड्रग्ज
SHARES

मुंबईच्या अंमली पदार्थ विभागाने अंमली पदार्थांची तस्करी प्रकरणी बोनाव्हेचूर एनझुवेचुक्कू एनवुडे या नायजेरियन तस्कराला मंगळवारी अटक केली. बोनाव्हेचूरकडून हस्तगत करण्यात आलेले अंमली पदार्थ हे त्याच्या सहकाऱ्याने पोटातून लपवून आणल्याचे सांगितले आहे. यातील एक जरी कॅप्सूल पोटात उघडले असती तर त्याच्या सहकाऱ्याचा जागीच जीव गेला असता. त्या प्रत्येक फेरीमागे दोघांना दहा लाख रुपये मिळत असल्याची कबुली बोनाव्हेचूर याने पोलिसांना दिली आहे.


१ किलो कोकेन हस्तगत

मूळचा दक्षिण अफ्रिकेचा रहिवाशी असलेला बोनाव्हेचूर हा एप्रिल महिन्यात भारतात टूरिस्ट व्हिजावर पत्नी आणि चार वर्षाच्या मुलीसह आला होता. तो कोपरखैराने येथे भाड्याने रहात होता.  पोलिसांना त्याने आपण कपड्याचा व्यावसायिक असल्याचे सांगितले. मात्र याच कपड्याच्या व्यवसायाआड तो अंमली पदार्थांची तस्करी करत असल्याचे त्याने कबूल केले आहे. अंमली पदार्थ तस्करांकडून कपड्याच्या व्यवसायासाठी त्याला अडीच लाख रुपये दिले जात होते. भारतात कपडा व्यापारी म्हणून वावरत तो परदेशातून लपवून आणलेले ड्रग्ज पोहचवायचा.


कॅप्सूल गिळून तस्करी

आंतरराष्ट्रीय ड्रग्ज बाजारात कोकेनला मोठी मागणी आहे. केनियातून हे माफिया एखाद्या तस्कराला एक किलोचे कोकेन छोट्या कॅप्सूलमध्ये भरून ते कॅप्सूल तस्कराला गिळून भारतात पाठवायचे. भारतात आल्यानंतर तो तस्कर दिल्ली किंवा मुंबईतील हाॅटेलमध्ये बाथरूमवाटे ड्रग्ज कॅप्सूल पुन्हा मिळवून ते साफ करून बोनाव्हेचूरला दिले जायचे. त्यानुसार बोनाव्हेचूर ते तस्करांपर्यंत पोहचवायचा. या प्रत्येक खेपेमागे दोघांना ही १० ते १५ लाख रुपये मिळायचे. केनियात त्या पैशांची किंमत दुप्पट असते. विशेष म्हणजे एका फेरीनंतर तो तस्कर पुढे पाच वर्ष त्या देशात पाठवला जात नाही.  


तैवानला पळणार होता

बोनाव्हेचूर हा वांद्रे परिसरात ड्रग्जची तस्करी करण्यासाठी आला असताना पोलिसांना रंगेहाथ सापडला. त्यावेळी त्याच्याजवळ १ किलो २० ग्रॅम वजनाचे उच्च प्रतीचे कोकेन सापडले. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत ६ कोटी १२ लाख रुपये आहे. या पूर्वीही तो २००२ मध्ये भारतात ड्रग्जच्या तस्करीसाठी आला असल्याची कबुली त्याने दिली आहे. या डिलिव्हरीनंतर बोनाव्हेचूर हा कुटुंबाला घेऊन तैवानला जाणार होता. पोटातून ड्रग्ज आणण्याची ही पहिली वेळ नाही. या एप्रिल आणि जानेवारी २०१९ मध्ये ही बोनाव्हेचूरच्या टोळीचे ड्रग्ज पोलिसांनी अशाच प्रकारे पकडल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवदीप लांडे यांनी दिली.



हेही वाचा - 

६ कोटींच्या कोकेनसह नायजेरियन तस्कराला अटक




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा