पतीनंच पत्नीवर केला प्राणघातक हल्ला

  Mumbai
  पतीनंच पत्नीवर केला प्राणघातक हल्ला
  मुंबई  -  

  मुंबई - महानगरपालिकेत महिला सुरक्षा रक्षकाचं काम करणाऱ्या महिलेवर तिच्याच पतीनं चाकू हल्ला केल्याची घटना मुंबई सेंट्रल परिसरात घडलीय. या प्रकरणी नागपाडा पोलिसांनी रामपाल राठोड (27) याला अटक केलीय.

  असं समजतंय की रामपाल हा कामावर जात नसे आणि दारू पिऊन पती रूपवतीला मारहाण करत असे. त्याच्या त्रासाला कंटाळून रूपवती मुंब्रा येतील नवऱ्याचे घर सोडून आग्रीपाडा येथे माहेरी आली होती. शनिवारी रामपालने रुपावतीच्या माहेरी जाऊन तिला पुन्हा आपल्या घरी येण्यास सांगितले, पण तिनं घरी येण्यास नकार दिला. रात्री 11 च्या सुमारास कामावरून परतताना रामपालने तिला वाटेतच अडवलं आणि तिला घरी येण्यास सांगू लागला, ज्याला रुपवतीने स्पष्ट शब्दांत नकार दिला. त्यानंतर मात्र रामपालचा सयंम सुटला आणि त्याने आपल्याच पत्नीवर चाकूने हल्ला केला. रुपवतीने आरडाओरड केला आणि तिथे जमलेल्या नागरिकांनी रामपालला पकडून पोलिसांच्या हावाली केले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.